विकी-कतरिनामध्ये सलमान खानची ठिणगी; एक्स कपल पुन्हा येणार एकत्र?

देशातील सर्वात लोकप्रिय रिएलिटी शोपैकी एक, बिग बॉस 16 सुरू झाला आहे

Updated: Oct 27, 2022, 05:41 PM IST
विकी-कतरिनामध्ये सलमान खानची ठिणगी; एक्स कपल पुन्हा येणार एकत्र? title=

मुंबई : देशातील सर्वात लोकप्रिय रिएलिटी शोपैकी एक, बिग बॉस 16 सुरू झाला आहे आणि त्याचा चाहता वर्ग या शोसाठी खूप उत्सुक आहे. बिग बॉस सुरू झाल्यानंतर काही वेळातच होस्ट सलमान खानला डेंग्यू झाला, त्यामुळे त्याच्या जागी बिग बॉसच्या ओटीटी होस्टचं काम करण जोहरने हाताळलं.

आता, सलमान खान बरा झाला आहे आणि बिग बॉसच्या 'वीकेंड का वार' होस्ट करण्यास तयार आहे. सलमान त्याच्या शोमध्ये धमाका करणार आहे. तोही त्याची एक्स गर्लफ्रेंड, विकी कौशलची पत्नी अभिनेत्री कतरिना कैफसोबत. याविषयी अधिक जाणून घेऊया..

सलमान-कतरिना पुन्हा एकत्र!
जर तुम्ही बिग बॉसचे चाहते असाल तर तुम्हाला ही बातमी चांगलीच आवडेल. अभिनेता सलमान खान या शोचा होस्ट म्हणून पुनरागमन करत आहे आणि या आठवड्यातील शोचा 'वीकेंड का वार' होस्ट करणार आहे. शोशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी सलमानची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफही सलमानसोबत दिसणार आहे.

एक्स गर्लफ्रेंड या शैलीत बिग बॉस 16 मध्ये प्रवेश करेल
गोष्ट अशी आहे की विकी कौशलची पत्नी कतरिना कैफ तिचा आगामी चित्रपट फोन भूतच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कतरिना कैफ देखील तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस 16 मध्ये पोहोचणार आहे. त्याचप्रमाणे दोन्ही एक्स कपल पडद्यावर एकत्र येणार असल्याने दोघांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

कतरिना कैफसोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील सहभागी होणार आहेत. कतरिना-विकीच्या लग्नानंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा कतरिना आणि सलमान एकत्र दिसणार आहेत.

'फोन भूत' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे त्यामुळे या चित्रपटाची कथा आणि इतर तपशील याविषयी प्रेक्षकांना बरीच माहिती असली तरी, एक मोठे कुतूहल चित्रपटातील भुताच्या पात्राबद्दल दर्शकांमध्ये होते. मात्र आता दर्शकांना या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे कारण, या चित्रपटात कतरिना कैफ एका सुंदरशा भूताच्या भूमिकेत दिसणार आहे.

आतापर्यंत आपण कतरीनाला चित्रपटांमध्ये फक्त ग्लॅमरस भूमिकेत पाहिलं असून, कतरिना पहिल्यांदाच पडद्यावर भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने, कतरिनाला पडद्यावर अशा अनोख्या भूमिकेत पाहणे दर्शकांसाठी खूप रोमांचक असेल. बॉलिवूडमधील महिला सुपरस्टार्सपैकी एक, कतरिना आता भूताच्या रूपात वेगळ्या प्रकारची मोहिनी घेऊन येते आहे जी चित्रपट रसिकांसाठी नक्कीच एक पर्वणी असेल. फोन भूत हा कतरिनाचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट आहे, त्यामुळे देखील रसिकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.