मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) यांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र काही वेळातच या दोघांच्या टीमने ही बातमी नाकारली. कतरिना कायमच आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. कधी सलमान खान तर कधी रणबीर कपूर आणि कधी विक्की कौशल. कतरिनाच्या या अफेअर्समुळे ती अनेकदा चर्चेत आली आहे.
सलमान खान आणि कतरिना कैफ किती एकमेकांच्याजवळ आहोत हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. सलमान कतरिनाला पसंत करतो. हे त्याच्या व्हिडिओजमधून अनेकदा समोर आलं आहे. एका व्हिडीओत सलमान खान कतरिनाला टोमणा मारताना दिसत आहे. सलमानने कतरिनाला सगळ्यांसमोर 'कपूर' अशी हाक मारली. तिने 'खान' होण्याची मोठी संधी हुकली...
सगळ्यांसमोर कतरिना लाजली हा किस्सा आहे 2014 सालचा, जेव्हा सलमान खानन अर्पिता आणि आयुष शर्माच्या लग्नात उपस्थित होता. या लग्नाला कतरिना देखील गेली होती. सलमान स्टेजवर कतरिनाला बोलावतो. मात्र कतरिना येत नाही. यावेळी सलमान खान कतरिनाला "कपूर' असं संबोधतो. यानंतर कतरिनाला स्टेजवर यावंच लागतं.
सलमान आणि कतरिना (Salman And Katrina) ने 'मैंने प्यार क्यों किया', 'युवराज', 'एक था टाइगर', 'टाइगर जिंदा है' आणि 'भारत' सारख्या सिनेमात एकत्र काम केलंय. लवकरच हे दोघं 'टायगर 3' मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचं शुटिंग सुरू आहे. यासोबतच कतरीना (Katrina Kaif) 'फोन भूत' आणि 'सूर्यवंशी' सारख्या सिनेमात दिसणार आहे.