मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाला आहे. सलमान खानने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. ''आज मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे'' अशा आशयाचं ट्विट सलमाननं केलं आहे. सकाळपासूनच हॉस्पिटबाहेरील सलमानचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
व्हायरल झालेल्या फोटोंनंतर सलमाननं आपण लस घेतल्याचं सोशल मीडियाद्वारे सांगितलं आहे. सलमान खान नुकताच मुंबईतील लीलावती रुग्णालयाबाहेर स्पॉट झाला होता.यावेळी तो ग्रे टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्समध्ये दिसला. यावेळी तो पापाराझींशी काहीच न बोललो थेट रुग्णालयात निघून गेला. यापूर्वी मंगळवारी अभिनेता संजय दत्तनेही अँटी-कोरोना व्हायरस लसीचा पहिला डोस घेतला.
Took my first dose of vaccine today....
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 24, 2021
61 वर्षीय संजय दत्तने मुंबईतील बीकेसी लसी केंद्रात लस घेतली. लस घेतल्यानंतर संजयने आपले फोटो ट्विट करत लिहिले की, "कोविड -१९ लसिचा पहिला डोस मी आज बीकेसी लसी केंद्रात घेतला आहे'' अशा आशयाचं कॅप्शन संजयन पोस्ट केलेल्या ट्विटला दिलं आहे.
याआधी सलमान खानचे वडील सलीम खान, सलमा खान आणि हेलन यांनीही कोविड -१९ची लस घेतली आहे. याशिवाय अनेक सेलिब्रिटींना देखील कोरोनाची लस घेतली आहे. तसंच बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं दिसून येत आहे. सतीश कौशिक, रणबीर कपूर आणि आमिर खान हे कालाकार कोरोना पॉझिटीव्ह आले आसून उपचार घेत आहेत..