कशी झाली होती कतरीनाची सलमानसोबत पहिली भेट, जाणून घ्या किस्सा

सलमान खाननेच कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली.

Updated: May 13, 2021, 01:13 PM IST
कशी झाली होती कतरीनाची सलमानसोबत पहिली भेट, जाणून घ्या किस्सा

मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफची मैत्री खूप जुनी आहे. सलमान खाननेच कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. कॅटनो इंडस्ट्रीमध्ये केलेल्या मेहनतीच्या बळावर एक वेगळे स्थान मिळवलं. आज तिचा चाहतावर्ग संपूर्ण जगभरात आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ खूप छान बॉन्डिंग आहे. हे दोघं पहिल्यांदा कसे भेटले याची कहाणीही कमी रंजक नाही.

कतरिना कैफने एका मुलाखतीत सलमान खानबरोबर तिच्या पहिल्या भेटीचा उल्लेख केला होता. कतरिना म्हणाली होती की, ती सलमानबरोबरची पहिली भेट कधीच विसरू शकत नाही. कारण आमची पहिला भेट खूप गंमतीदार होती.

वास्तविक कतरिना सलमान खानची बहीण अल्वीरा खान अग्निहोत्रीची मैत्रिण आहे. अल्वीराने सलमानच्या वाढदिवसादिवशी कतरिनाला बर्थडे पार्टीमध्ये आमंत्रित केलं. यावेळी, दोघंही पहिल्यांदा भेटले.

कतरिना कैफने सांगितले की जेव्हा ती सलमानला पहिल्यांदा भेटली तेव्हा, तो शर्टलेस होता. जेव्हा कतरिनाने त्याच्याकडे पाहिलं तिला हसू आवरत नव्हतं. यावर सलमानने देखील स्पष्टीकरण दिलं होतं.

त्यावेळी मी शॉवर घेत असल्याचं सलमानने सांगितलं. त्यावेळी मला जरा पण अंदाज नव्हता की, कतरिना ईथे पाहूणी म्हणून आली आहे, आणि त्याची वाट पहात आहे याची त्याला कल्पना देखील नव्हती.

सलमानच्या बर्थडे निमित्ताने एकत्र ठेवलेले हे छोटे गेट टू गेदर होतं. सलमान देखील पहिल्याच नजरेत कतरिनावर फिदा झाला होता. त्यावेळी कॅतरिना 18 वर्षांची होती.

सलमान खान आणि कतरिना कैफमध्ये खूपच छान बॉन्डिंग आहे. दोघेही एकमेकांच्या अगदी जवळचे आणि चांगले मित्र आहेत. केवळ वैयक्तिक आयुष्यातच नाही तर स्क्रीनवर देखील दोघांच्या बॉन्डिंगला तोड नाही.

दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. यात टायगर जिंदा है, एक था टायगर, मैंने प्यार क्यों किया आणि पार्टनर सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांमध्ये या दोघांना चाहत्यांकडून खूप प्रेम मिळालं.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x