KRKअडचणीत, राधे सिनेमावरून सलमान खाननं ठोकला मानहानीचा दावा

सलमान खानच्या लीगल टीमने केली कारवाई

Updated: May 26, 2021, 11:38 AM IST
KRKअडचणीत, राधे सिनेमावरून सलमान खाननं ठोकला मानहानीचा दावा title=

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने अभिनेता कमाल आर खान (KRK) विरोधात मुंबई न्यायालयान मानहानीचा केस दाखल केली आहे. हे प्रकरण आहे सलमान खानच्या 'राधे' सिनेमातील रिव्ह्यूशी जोडलं गेलं आहे. सोमवारी सलमान खानच्या लीगल टीमकडून कमाल आर खानला नोटीस पाठवण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानची लीगल टीम गुरूवारी सिविल कोर्टच्या एडिशनल सेशन जजसोबत याबाबत उल्लेख करणार आहे.

कमाल आर खानने देखील यावर रिऍक्ट केलं आहे. ट्विटमध्ये म्हटलं आहे की, डिअर सलमान खान हा मानहानीचा दावा स्पष्ट करतंय तुझ्यातील निराशेची जाणीव आहे. मी तुझ्या फॉलोअर्सकरता हा रिव्ह्यू केला आहे. मी माझ काम करतोय. मला तुझ्या सिनेमाचा रिव्ह्यू करण्यापासून रोखण्यापेक्षा तू चांगले सिनेमे बनवं. मी खऱ्यासाठी लढतो आणि लढत राहणार आहे. 

केआरके बॉलिवूड सिनेमाचं आपल्या स्टाइलने रिव्ह्यू करते. त्यांनी राधे सिनेमाचा रिव्ह्यू केला आहे. त्यांनी दुबईतून राधे सिनेमा अर्धा पाहिल्यानंतर रिव्ह्यू केला आहे. त्यांना हा सिनेमा आवडला नाही.