'रेस 3' चित्रपटासाठी सलमान खान पहिल्यांदा करणार 'हे' काम

यंदाच्या ईदला सलमान खान त्याच्या चाहत्यांसाठी 'रेस 3' हा सिनेमा घेऊन आला आहे. 

Updated: May 23, 2018, 07:26 AM IST
'रेस 3' चित्रपटासाठी सलमान खान पहिल्यांदा  करणार  'हे' काम  title=

 मुंबई : यंदाच्या ईदला सलमान खान त्याच्या चाहत्यांसाठी 'रेस 3' हा सिनेमा घेऊन आला आहे. या चित्रपटाच्या दमदार ट्रेलर लॉन्चनंतर चित्रपटाची सारी टीम प्रमोशनमध्ये व्यस्त झाली आहे. मात्र 'रेस 3' या चित्रपटातून सलमान एका नव्या व्यवसायामध्ये पदार्पण करणार आहे.  

 सलमान खान वितरण क्षेत्रामध्ये   

 'रेस 3' चित्रपटातून सलमान खान डिस्ट्रिब्युशन म्हणजेच वितरण क्षेत्रातही पदार्पण करणार आहे. अभिनयाव्यतिरिक्त सलमान खान प्रोडक्शन क्षेत्रामध्ये आहे. पण सिनेमाचा व्यवसाय पाहाता आता सलमान खानची कंपनी वितरण क्षेत्रामध्येही उतरणार आहे. अनेक बिग बजेट सिनेमांचं प्रोडक्शन सलमान खानच्या कंपनीने सांभाळलं आहे. 

 'रेस 3' पहिला सिनेमा  

 सलमान खान कंपनी 'रेस 3' या चित्रपटाच्या वितरणाचीदेखील जबाबदारी सांभाळणार आहे. सलीम खान या व्यवसायात लक्ष घालणार आहेत. सध्या सलमान खान 'भारत' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. 

 तगडी स्टारकास्ट  

 सलमान खान, जॅकलीन फर्नांडीस, अनिल कपूर, बॉबी देओल, सलीम साकिब, डेजी शहा अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटातील पहिलं गाणं 'हिरिए' देखील रिलिज करण्यात आलं आहे. यामध्ये जॅकलिन आणि सलमान खान एकत्र थिरकले आहेत.