मुंबई : काही वर्षांपूर्वी सलमान खानच्या सारेगमप लिटिल चॅम्प्स या रिअॅलिटी शोच्या एका विशेष भागाच्या चित्रीकरणा दरम्यान स्पर्धक हृतिक गुप्ताने 'साजन मिलने तमन्ना है' साजन या चित्रपटा मधील हे गाणे सादर केलं, तेव्हा सलमान सह-अभिनेता दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीत भावूक झाला. मैने प्यार किया 'हा सलमान खानचा दुसरा चित्रपट होता. सलमानचा लक्ष्मीकांतबरोबरचा हा पहिलाच चित्रपट होता. अशा सिनेमांत सलमानने यशाचं सगळं श्रेय लक्ष्मीकांत यांच्या कॉमिक टाइमिंगला देताना दिसला. आणि यामुळे एकदा सर्वोत्कृष्ट कलाकार आणि विनोदी कलाकार लक्ष्मीकांत यांच्या आठवणी पुन्हा नव्याने ताज्या झाल्या.
1995मध्ये 'झपाटलेला' हा चित्रपट मुलांना घाबरवण्यासाठी बनवला गेला होता. ज्यामध्ये तात्या विंचू आणि लक्ष्या यांच्यात भांडण होतात. लक्ष्मीकांत बर्डे यांनी या चित्रपटात लक्ष्याची भूमिका साकारली होती, लक्ष्मीकांत अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जातात. बहुतेक चित्रपटांत त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत ते 'कॉमेडी सुपरस्टार' म्हणून ओळखले जातात.
हम आपके हैं कौन 'च्या सह-कलाकारासोबत प्रेम, दोन विवाह केले
1994 मध्ये रिलीज झालेल्या 'हम आपके हैं कौन' हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटात लक्ष्मीकांत यांनी सलमानचा मित्र आणि घरातील महत्वाचा सदस्य लल्लू प्रसादची भूमिका साकारली होती. या चित्रपटाशिवाय लक्ष्मीकांत यांची खऱ्या आयुष्यात देखील सलमानसोबत खूप चांगली मैत्री होती. या दोघांनीही साजन या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. फिल्ममध्ये रुही नावाच्या को-स्टारच्या ते प्रेमात पडले...आणि काही दिवसांतचं या कपलने लग्नगाठ बांधली..
मात्र त्यांचे संबंध फार काळ टिकले नाहीत आणि घटस्फोट न घेताच हे दोघं वेगळे झाले. यानंतर अभिनेत्री प्रिया अरुण त्यांच्या आयुष्यात आल्या. प्रिया मराठी चित्रपटांमधील नामांकित अभिनेत्रीही राहिली आहे. जान, गुड्डू, बीटा, दीदार अशा हिंदी चित्रपटातही प्रिया यांनी काम केलं. दोघेही बर्याच दिवसांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांनीही बऱ्याच दिवसानंतर लग्नाचा खुलासा केला. त्यांना दोन मुलेही आहेत.
अनेक बड्या स्टार्ससोबत केली स्क्रिन शेअर
लक्ष्मीकांतने सलमान, माधुरी दीक्षित, संजय दत्त, दिव्या भारती, करिश्मा कपूर अशा मोठ्या स्टार्ससोबत काम केलं होतं. साजन, हम आपके हैं कौन, खिलौना बना खलनायक, क्रिमिनल, अनाड़ी, चाहत सारख्या अशा चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं. 16 डिसेंबर 2004रोजी लक्ष्मीकांत बर्डे यांनी मूत्रपिंडाच्या आजारामुळे जगाला निरोप दिला.