'या' कलाकारासाठी 'भारत'च्या सेटवर सलमान खान झाला फोटोग्राफर

सलमानच्या बहुचर्चित आगामी सिनेमा 'भारत'च्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. माल्टामध्ये 'भारत'चं शूटिंग सुरू आहे. 'भारत'पूर्वी ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाचं शूटिंग माल्टामध्ये झाले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये या देशाबद्दल तेथील लोकेशनबाबत फारशी माहिती नाही. मात्र 'भारत'च्या निमित्ताने माल्टामध्ये पोहचलेल्या अनेक कलाकारांनी तेथील फोटो शेअर केले आहेत. 

Updated: Aug 19, 2018, 10:59 AM IST
'या' कलाकारासाठी 'भारत'च्या सेटवर सलमान खान झाला फोटोग्राफर  title=

माल्टा : सलमानच्या बहुचर्चित आगामी सिनेमा 'भारत'च्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. माल्टामध्ये 'भारत'चं शूटिंग सुरू आहे. 'भारत'पूर्वी ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाचं शूटिंग माल्टामध्ये झाले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये या देशाबद्दल तेथील लोकेशनबाबत फारशी माहिती नाही. मात्र 'भारत'च्या निमित्ताने माल्टामध्ये पोहचलेल्या अनेक कलाकारांनी तेथील फोटो शेअर केले आहेत. 

सुनील ग्रोव्हरचं खास फोटोशूट 

सलमान खानच्या 'भारत'  सिनेमात विनोदी कलाकार सुनील ग्रोव्हरदेखील खास भूमिकेत दिसणार आहे. अली अब्बास दिग्दर्शित या सिनेमाच्या शूटिंगमधून वेळ काढून सुनील ग्रोव्हरचा एक फोटो सलमान खानने क्लिक केला आहे. या फोटोशूटची एक झलक सुनील ग्रोव्हरने ट्विटरवर शेअर केली आहे. या फोटोशूटबाबत लिहताना केवळ फोटोग्राफरकडे बघू नका. हे माल्टा आहे. 'भारत'चं शुटींग करतोय असं म्हणत हा फोटो माझ्याकडे आला की शेअर करेन असेही सुनीलने म्हटले आहे.  

 

भारतचं दुसरं शेड्युल 

भारत या सिनेमाचं दुसरं शेड्युल सद्या माल्टामध्ये सुरू आहे. सलमान खानसोबत अभिनेत्री प्रियंका चोप्रा या सिनेमात झळकणार होती. मात्र बॉयफ्रेंड निक जोनाससोबत साखरपुडा करण्यासाठी 'भारत' सिनेमातून माघार घेतली. प्रियांकानंतर आता कॅटरिना कैफची या सिनेमात वर्णी लागली आहे.