माधुरी दीक्षितने केला 'शेरा'चा गौरव

सलमान खानची ओळख बॉलिवूडमध्ये 'दबंगस्टार' अशी आहे. पण त्याच्या इतकेच एक ओळखीचं नाव म्हणजे 'शेरा' .

Updated: Mar 9, 2018, 06:30 PM IST
माधुरी दीक्षितने केला 'शेरा'चा गौरव  title=

मुंबई : सलमान खानची ओळख बॉलिवूडमध्ये 'दबंगस्टार' अशी आहे. पण त्याच्या इतकेच एक ओळखीचं नाव म्हणजे 'शेरा' .

अनेक ठिकाणी सलमान खानसोबत सावलीसारखा 'शेरा' सोबत असतो. शेरा हा सलमान खानचा बॉडीगार्ड आहे.  

खास पुरस्कार 

सलमान खानचा बॉडीगार्ड असणार्‍या 'शेरा'ची सिक्युरटी एजंसी आहे. शेराच्या सिक्युरिटी एजेंसीचं काम, सलमान खानच्या पाठीशी उभं राहणं या त्याच्या  कामाचा गौरव करण्यात आला आहे. 

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने शेराचा पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला. 

रूपेरी पडद्यावर शेरा 

सलमान खानच्या 'बॉडीगार्ड' या सिनेमामध्ये शेराची झलक दिसली होती.  टायटल ट्रॅकमध्ये शेरा गाणं गाताना दिसला होता. या गाण्यामध्ये सलमान खानसोबत कॅटरिना कैफ होती.  

शेरा मुलगा बॉलिवूडमध्ये येणार  ? 

सलमान खानने एकदा शेराचा मुलगा टायगर यांचं कौतुक करताना त्याची पर्सलिटी कोणत्या हिरोपेक्षा कमी नाही असं म्हटलं होतं. विशीतही टायगर खूप प्रभावशाली आहे. सलमान खान त्याला लवकरच बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे. असे त्याने म्हटलं होतं.