सलमान राजी, शेहनाज राजी, मग शेराचा प्रॉब्लेम काय? बॉडीगार्ड शेराचा चढला पारा

सलमान खान आणि शहनाज गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच शेराच्या संतप्त प्रतिक्रियेची जोरदार चर्चा सुरू आहे. 

Updated: May 4, 2022, 03:20 PM IST
सलमान राजी, शेहनाज राजी, मग शेराचा प्रॉब्लेम काय? बॉडीगार्ड शेराचा चढला पारा title=

मुंबईः सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माने ईदच्या निमित्ताने तिच्या घरी एका ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील सर्वच दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र, शहनाज गिल सर्वाधिक चर्चेत राहिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पार्टीमध्ये शहनाज गिल सलमान खानच्या समोर मागे फिरताना दिसली आणि यावेळी सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा कशनाज तिच्या वागण्यावर थोडासा रागवताना दिसला. सलमान खान आणि शहनाज गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच शेराच्या संतप्त प्रतिक्रियेची जोरदार चर्चा सुरू आहे. 

वास्तविक शेरा सलमान खानच्या सुरक्षेबाबत खूप गंभीर आहे आणि अशा परिस्थितीत शहनाज गिलच्या बालिशपणामुळे त्याला सार्वजनिक ठिकाणी सलमान खानच्या सुरक्षेत थोडीही कुचराई होऊ द्यायची नाही. या पार्टीत शहनाज गिल अतिशय सुंदर काळा सूट घालून पोहोचली होती आणि आता शहनाजचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्टीत शहनाज गिलने सलमान खानसोबत सर्वाधिक धमाल केली. 

फोटो ऑप दरम्यान शहनाज गिलने सलमान खानसोबत बरेच फोटो क्लिक केले आणि त्यादरम्यान शहनाज आणि सलमान एकमेकांना मिठी मारताना आणि खूप बोलतांना दिसले. शहनाज आणि सलमानमधील हे बाँडिंग सगळ्यांनाच आवडले आहे. मात्र दोघांचं मिठी मारणं शेराला काही आवडलेलं दिसत नाही. 

शेरा हा सलमान खानचा बॉडीगार्ड असून गेल्या 25 वर्षांपासून सलमानच्या सुरक्षेची जबाबदारी तो पार पाडत आहे.