कतरिना- सलमानने केवळ चाहत्यांसाठी उचललं हे पाऊल, आता सगळेच आनंदात

चाहते टायगर 3 ची आतुरतेने वाट पाहत होते 

Updated: Mar 4, 2022, 01:07 PM IST
 कतरिना- सलमानने केवळ चाहत्यांसाठी उचललं हे पाऊल, आता सगळेच आनंदात title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ पुन्हा एकदा चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. टायगर 3 मधून दोघांनी पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकण्याची तयारी केली आहे.

चाहते टायगर 3 ची आतुरतेने वाट पाहत होते आणि त्यांनी आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून कतरिनाने सांगितले आहे की, टायगर 3 रिलीजसाठी तयार आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तामिळ आणि तेलुगूमध्येही प्रदर्शित होणार आहे. टायगर 3 हा सिनेमा 2023 मध्ये ईदच्या मुहूर्तावर रिलीजसाठी सज्ज आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कतरिना कैफ जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. ती स्टंट करताना दिसत आहे. यासोबतच तिची कोरिओग्राफरही कतरिनाला योग्य मुव्हमेंट करण्यासाठी मदत करताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओच्या शेवटी सलमान खानची एक झलक चाहत्यांना दाखवण्यात आली आहे. सलमान झोपलेला दिसत आहे आणि कतरिना त्याच्याकडे जाते आणि म्हणते की त्याने सराव करायला सुरुवात करावी. यावर सलमान म्हणतो की तो आधीच तयार आहे.