मुंबई : १९८९ मध्ये आलेल्या मैंने प्यार किया सिनेमातील सलमान-भाग्यश्रीची जोडी सुपरहिट ठरली. सुमन-प्रेमची ही प्रेमकहाणी चांगलीच गाजली. सलमानचा सोलो हिरो म्हणून हा पहिलाच सिनेमा होता तर भाग्यश्रीने या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला होता.
या सिनेमाने अनेक पुरस्कार पटकावले. तर दिग्दर्शक सुरज बडजात्या यांचा हिंदी सिनेसृष्टीत ट्रेंडसेट झाला. हा सिनेमा सुपरहिट झाला असला तरी ही जोडी पुन्हा काही प्रेक्षकांच्या भेटीस आली नाही. त्यानंतर सलमान खानचे करिअर उंचावत गेले आणि सलमान खान एक ब्रॅँड बनला. तर भाग्यश्रीने बुलबुल, त्यागी, पायल यांसारख्या सिनेमांत काम केले. पण ते बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्याने तिने बॉलिवूडला रामराम ठोकला. ४९ वर्षीय भाग्यश्री अजूनही इतकी फिट, पहा व्हिडिओज
आता भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु रॉनी स्क्रूवालाच्या 'मर्द को दर्द नहीं होता' सिनेमातून सिनेसृष्टीत पर्दापण करणार आहे. पण या सिनेमाची एक खासियत आहे. ती म्हणजे भाग्यश्री आणि सलमानची जोडी या सिनेमातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
सुत्रांनुसार, अभिमन्युच्या सिनेमात सलमान-भाग्यश्रीवर एक गाणे चित्रीत करण्यात आले आहे. खास गोष्ट ही की, हे 'मैनें प्यार किया' सिनेमातील एक सुपरहिट गाणे असेल. फक्त नव्या पीढीला लक्षात घेऊन हे गाणे रिक्रिएट केले जाईल. सलमान सध्या भारत सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.