जामीनानंतर सलमान खानने केलं पहिलं ट्विट

काळवीट शिकार प्रकरणातून जामीनावर सुटलेला सलमान खान सध्या भावूक झाला आहे. भावूक होऊन त्याने सोशल मीडियावर एक ट्विट केलं आहे. जोधपूर न्यायालयाने सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरवलं होतं. 2 दिवस कारागृहात राहिल्यानंतर आता त्याची जामीनावर सुटका झाली आहे. आता मुंबईत आल्यानंतक सलमान खानने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

Dakshata Thasale Updated: Apr 9, 2018, 07:27 PM IST
जामीनानंतर सलमान खानने केलं पहिलं ट्विट title=

मुंबई : काळवीट शिकार प्रकरणातून जामीनावर सुटलेला सलमान खान सध्या भावूक झाला आहे. भावूक होऊन त्याने सोशल मीडियावर एक ट्विट केलं आहे. जोधपूर न्यायालयाने सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरवलं होतं. 2 दिवस कारागृहात राहिल्यानंतर आता त्याची जामीनावर सुटका झाली आहे. आता मुंबईत आल्यानंतक सलमान खानने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

काय म्हणाला सलमान ? 

‘सदैव माझी साथ देणाऱ्या आणि ज्यांनी कधीच आशा सोडली नाही, अशा सर्व चाहत्यांचे मी मनापासून आभार मानतो. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद,’ असं ट्विट सलमानने केलं.  सलमान खानच्या जामीनासाठी होणाऱ्या सुनावणीच्या दिवशी चाहत्यांनी गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गर्दी केली. आणि त्यानंतर निकाल लागताच, जामीन मंजूर होताच त्यांनी जल्लोष साजरा केला. त्यानंतर जामीनावरून सुटका मिळाल्यानंतर सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटमधून चाहत्यांना भेटला. 

तीन बोटांच्या जेस्चरचा अर्थ काय?

आपल्यावर दाखवल्या जाणार्‍या प्रेमाचा आदर, त्याला नम्रतेने अभिवादन करण्यासाठी मिडल थ्री फिंगर्स दाखवले जातात. हॉलिवूड कादंबरी, 'हंगर गेम्स' हा हॉलिवूड सिनेमा आणि बॉलिवूडमध्येही 'मिडल थ्री फिंगर्स' ही मुद्रा खास लोकप्रिय झाली. 

सलमान खानच्या मुद्रेचा अर्थ काय ? 

सलमान खानच्या जय हो चित्रपटात सलमानने ही तीन बोटं दाखवण्याचं जेस्चर चाहत्यांसमोर आणलं. याचा चित्रपटात दाखवलेला संदर्भ म्हणजे,' मला धन्यवाद म्हणू नका. त्याऐवजी बाहेर जा, किमानतीन लोकांना मदत करा आणि त्यांनाही हा मदत पुढे करण्याची प्रेरणा द्या आणि त्यांना धन्यवाद म्हणा.. यामुळे जगा बदलायला मदत होईल.