मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेला अभिनेता दिलीप जोशी अर्थात जेठालाल आज ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. दिलीपला त्याच्या नावाने फार कमी लोक ओळखतात. पण जेठालालची ख्याती सर्वांनाच माहित आहे. दिलीपने अनेक चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये काम केले. परंतु 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेच्या माध्यमातून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. अपल्या विनोदी अभिनयाने त्याने सर्वांना पोट धरून हसण्यास भाग पाडले. आज त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
महत्त्वाचं सांगायचं झालं तर दिलीपने अभिनयाची सुरूवात अभिनेता सलमान खान स्टारर 'मैंने प्यार किया' चित्रपटातून केली. चित्रपटात त्याने रामू नोकराची भूमिका साकारली होती. १९८९ साली प्रदर्शित झलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान आणि दिलीप जोशी रुपेरी पडद्यावर झळकले होते. त्याकाळी या चित्रपटाने दमदार कामगिरी केली.
त्यानंतर दिलीप यांनी कधिही मागे वळून पाहिले नाही. वाट्याला आलेले यश, अपशांवर मात करत त्यांने आज चाहत्यांच्या मनात घर केले आहे. 'मैंने प्यार किया' चित्रपटानंतर दिलीपने “हम आपके हैं कौन” सलमानसोबत काम केले.
यशाकडे वाटचाल करत त्याने १९९५ साली टीव्ही विश्वाकडे आपला मोर्चा वळवला. “कभी ये कभी वो” ही त्याची पहिली मालिका. दिलीपने या दोन चित्रपटांशिवाय 'हिन्दुस्तानी', 'खिलाड़ी ४२०', हमराज या चित्रपटांमध्ये देखील भूमिका बजावली आहे.