सलमानच्या फॅन्सवर कोसळला दु:खाचा डोंगर

 सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे फॅन्स वेगवेगळ्या प्रतिक्रीया देत आहेत. 

Updated: Apr 5, 2018, 09:12 PM IST
सलमानच्या फॅन्सवर कोसळला दु:खाचा डोंगर  title=

मुंबई : सलमान खानला काळवीटच्या हत्येप्रकरणी जोधपुर न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सलमानला जामीन मिळणार की नाही हे उद्या समजेल. पण सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे फॅन्स वेगवेगळ्या प्रतिक्रीया देत आहेत. सलमान खानच्या फेसबुक फॅन पेजवर शोककळा पसरली आहे. काही फॅन्स न्यायालय आणि न्यायाधिशांना नावं ठेवत आहेत.

काहींनी तर थेट मोदींनाच यामध्ये खेचल आहे. सर्वजण सलमानसाठी प्रार्थना करत आहेत. सलमानच्या काही फॅन्सना तर एवढ दु:ख झालयं.दरम्यान, सैफअली खान, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या कलाकारांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आज सकाळी न्यायालयात पोहोचल्यावर सलमान खानने न्यायालयरूममध्ये न्यायाधीशांसमोर उभे राहून निर्दोष असल्याचे म्हटले. आरोपींपैकी सर्वात आधी सलमान खान न्यायालयात पोहोचला होता. १९९९ साली हम साथ साथ है चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना काळविटाची शिकार करण्यात आली होती. 

सलमानसाठी बहिणी रडल्या

 सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर सलमानची बहिण अलबिराला रडू आल्याचं सांगण्यात येत आहे.

सलमान खानच्या बहिणी त्यांच्या विषयी अधिक भावनिक आहेत. आज सलमानबरोबर बहिणी दिसल्या, पण भाऊ दिसत नव्हते, पण एकूणच सलमान खानला मोठा दिलासा आहे.

कैदी नंबर ३४३ 

 

 

 

मागील वेळेस जेव्हा सलमान खानला जोधपूर सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते.

तेव्हा त्याला बरॅक नंबर १ मध्ये ठेवण्यात आले. तेथे सलमान पाच दिवस होता. तेव्हा त्याचा कैदी क्रमांक ३४३ होता.

निकालावेळी सलमान झाला भावूक

खटल्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे न्यायालयाने विचारले. त्यावेळी मी निर्दोष आहे, असे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी सलमान भावूक झाला होता.