सलमानच्या बाल्कनीच्या आतला व्हिडिओ आला समोर

काळवीट शिकारप्रकरणी जोधपुर कोर्टाने सलमानला ५ वर्षाचा तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. पण २ दिवसातच त्याला जामिन मिळाला आणि तो बाहेर आला. त्यानंतर जोधपुरपासुन मुंबईपर्यंतच्या त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केला. सलमानच्या घराबाहेर त्याचे फॅन्स वाट पाहत तासनतास उभे होते. सलमानची एक झलक कॅमेरात टीपण्यासाठी सर्वांनी आपले मोबाईल कॅमेरा सुरू ठेवले होते. अखेर सलमानने आपल्या बाल्कनीत येऊन सर्वांना हात दाखविला. तसेच घरी जाऊन झोपा असेही खुणावले. हे सर्व घराबाहेरून माध्यमांच्या कॅमेऱ्यांनीही टीपलं. पण ट्विटर युझर आलोकने एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये सलमान खानच्या पाठीमागे उभे राहून काढलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

Updated: Apr 8, 2018, 07:08 PM IST
सलमानच्या बाल्कनीच्या आतला व्हिडिओ आला समोर  title=

मुंबई : काळवीट शिकारप्रकरणी जोधपुर कोर्टाने सलमानला ५ वर्षाचा तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. पण २ दिवसातच त्याला जामिन मिळाला आणि तो बाहेर आला. त्यानंतर जोधपुरपासुन मुंबईपर्यंतच्या त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केला. सलमानच्या घराबाहेर त्याचे फॅन्स वाट पाहत तासनतास उभे होते. सलमानची एक झलक कॅमेरात टीपण्यासाठी सर्वांनी आपले मोबाईल कॅमेरा सुरू ठेवले होते. अखेर सलमानने आपल्या बाल्कनीत येऊन सर्वांना हात दाखविला. तसेच घरी जाऊन झोपा असेही खुणावले. हे सर्व घराबाहेरून माध्यमांच्या कॅमेऱ्यांनीही टीपलं. पण ट्विटर युझर आलोकने एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये सलमान खानच्या पाठीमागे उभे राहून काढलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

'सरकार'ची आठवण

 सलमानला आलेला पाहताच हजारो चाहत्यांनी कॅमेराच्या फ्लॅशलाईट सुरु केल्या.

काजवे चमकावेत तसे मोबाईलचे फ्लॅश चमकू लागले. हे पाहता रामगोपाल वर्माच्या 'सरकार' सिनेमातील एंगल आठवला.

ज्यामध्ये अमिताभ बच्चन समोर असलेल्या जनतेला हात दाखवत आहेत. अस काहीस हा व्हिडिओ पाहून वाटलं.