मुंबई : सलमानच्या जामीनाबद्दल अजूनही काही स्पष्ट कळत नाही आहे. जोधपूर सत्र न्यायालय जामीनाबद्दल आज निर्णय सांगेल. त्यामुळ दोन दिवस सलमानने जेलमध्ये काढले आहेत. त्याच्या दोन्हीही बहिणी तेव्हापासूनच जोधपूरमध्येच मुक्कामी आहेत. मात्र मुंबईत असलेल्या सलमानच्या आईला मुलाची आठवण शांत बसून देत नाही. रिपोट्सनुसार, मुलाच्या काळजीने व्याकूळ झालेल्या सलमानच्या आईने सलमा खान यांनी मुलाशी फोनवर बोलण्यासाठी जेलमध्ये काही पैसे भरले.
४ एप्रिलला मुंबईहुन जोधपूरला पोहचलेल्या सलमान खानला ५ एप्रिलला जोधपूर सत्र न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सूनावली आहे. तेव्हापासून २ दिवस सलमान जेलमध्येच आहे. जेलमध्ये जाण्यापूर्वी सलमानने आपले वडील सलीम खान यांच्याशी फोनवर बोलला.
सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर अनेक सेलिब्रेटींनी सलमानच्या कुटुंबियांची भेट घेतली. तर बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा त्याला भेटण्यासाठी जेलमध्ये गेली. प्रिती सुमारे अर्धा तास सलमानशी बोलत होती. तेव्हा मीडियाच्या कॅमेऱ्यांना चुकवत ती तेथून बाहेर पडली. सलमान आणि प्रितीने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले होते.