Sairat : 'परश्या' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

आकाशचा हटके लूक 

Updated: Feb 7, 2021, 03:56 PM IST
Sairat : 'परश्या' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला  title=

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत बॉक्स ऑफिसवर १०० कोटीचा आकडा गाठलेला 'सैराट' (Sairat) सिनेमा. या सिमेमातील आर्ची आणि परश्याला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. या कलाकारांनी पहिल्याच सिनेमातून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. 'सैराट' सिनेमात परश्याची भूमिका अभिनेता आकाश ठोसरने (Akash Thosar) साकारली आहे. पहिल्याच सिनेमातून आकाशने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. यानंतर आता आकाश एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. 

आकाश अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar)  दिग्दर्शित ‘१९६२- द वॉर इन द हिल्स’  (1962 : The War in the hills) या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारताना दिसणार आहे. या सीरिजमध्ये आकाश एकदम वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तो सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आकाशने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सीरिजमधील लूकचा फोटो शेअर केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

‘१९६२- द वॉर इन द हिल्स’ या सीरिजमध्ये आकाशसोबत अभिनेता अभय देओल, सुमित व्यास हे मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ही सीरिज २६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

या अगोदर आकाशने महेश मांजरेकर दिग्दर्शित 'फू' सिनेमातही काम केलंय. या सिनेमाचा ट्रेलर सलमान खानने रिलीज केला होता. या सिनेमात तरूणाईचं भावविश्व मांडण्यात आलं आहे. या सिनेमातील आकाशची भूमिका प्रेक्षकांनी पसंत केली पण सिनेमा प्रेक्षकांचं मन जिंकू शकला नाही.