मुंबई : सैफ अली खानने बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंहसोबत पहिलं लग्न केलं होतं. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी गुपचूप लग्न केलं. आणि आपल्या घरच्यांसोबत ही गोष्ट लपवून ठेवली होती. खरतर दोघांना या गोष्टीची भिती होती की, त्यांच्या वयाच्या गॅपमुळे दोघांचे घरचे या लग्नाला नकार देतील. दोघांच्या लग्नानंतर या दोघांना पहिली मुलगी साराचा जन्म झाला आणि इब्राहिम अली खानचा जन्म झाला. या दोघांच्या जन्मानंतर यांचा परिवार खऱ्या अर्थाने पुर्ण झाला मात्र या गोड परिवाराला कुणाची तरी नजर लागली.
सैफ-अमृतामध्ये वाद वाढू लागले. आणि एक दिवशी १३ वर्षांनंतर हे नातं घटस्फोटापर्यंत पोहचलं. परिवाराने मित्र मैत्रिणींनी समजूत काढल्यावरही या कपलने कोणचच ऐकलं नाही. शेवटी या दोघांनी घटस्फोट घेतलाच. घटस्फोटानंतर मुलांची जबाबदारी कोर्टाने अमृतावर सोपावली. कारण सैफ अमृतापेक्षा वयाने लहान होता. कोर्टाने सैफला मुलांना भेटण्याची परवानगी दिली मात्र असं होवू शकलं नाही.
एका मुलाखती दरम्यान सैफने या विषयी बोलताना सांगितलं की, मी आणि माझी पत्नी अमृता आता आम्ही वेगळे झालो आहोत. मी माझ्या पत्नीच्या पर्सनल स्पेसचा आदर करतो. मात्र माझ्या वॉलेटमध्ये माझा मुलगा ईब्राहिमचा फोटो पाहून कायम मला रडू येतं. मी आमची मुलगी साराला भरपूर मिस करतो. कारण मला तिला भेटण्याची परवानगी नाही.
तिला माझ्यासोबत येण्याची आणि राहण्याची परवानगीही नाही, अमृता मला भेटू देत नाही. का ? कारण अमृताला वाटतं की माझी गर्लफ्रेंड रोझा कॅटोलिना माझ्या मुलांचं ब्रेनवॉश करेल. माझी मुलं अमृताच्या नातेवाईकांवर आणि नोकरांवर अवलंबून मोठी होत आहेत कारण अमृता मालिकेच्या शूटिंगला जाते. मी माझ्या कुटुंबाला आधार देण्यास तयार असताना तिने हे सगळं करण्याची काय गरज आहे.