सैफ अली खानला करिनाशिवाय जगणं कठीण, फक्त तिच्यासाठी सैफचं मोठं पाऊल

करिना कपूर काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.  

Updated: Dec 16, 2021, 06:46 PM IST
सैफ अली खानला करिनाशिवाय जगणं कठीण, फक्त तिच्यासाठी सैफचं मोठं पाऊल title=

मुंबई : करिना कपूर काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.  हा रिपोर्ट समोर आल्यानंतर करिनाने तिच्या दोन मुलांसह स्वतःला क्वारंटाईन केलं आहे.  यामुळे सैफही तिला भेटू शकत नाही. पण सैफने करीनासाठी असा मार्ग काढलाय की, तुम्हीही बघतच रहा राहाल. सैफचा फोटो शेअर करण्यापासून अभिनेत्री स्वतःला रोखू शकली नाही.

सैफने केलं हे काम 
करीना कपूर सध्या कोरोना पॉझिटिव्ह आली आहे आणि करीनाला जेव्हा व्हायरसची लागण झाली होती. तेव्हा तिचा पती सैफ अली खान मुंबईत नव्हता आणि आता तो परत आला आणि आपल्या बेगमला भेटण्यासाठी तळमळत होता. तेव्हा तो करीनाला पाहण्यासाठी बाजूच्या बिल्डींगच्या गच्चीवर गेला आणि तिथून तो अभिनेत्रीला आणि मुलांना पाहू लागला.

पार्टीत गेली होती करीना
करीना कपूरला संसर्ग झाल्याचं आढळल्यानंतर बीएमसीने खबरदारी म्हणून अभिनेत्रीची संपूर्ण इमारत सील केली. आणि तिथे येणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांत करीना आणि अमृताही अनेक पार्ट्यांमध्ये गेल्या होत्या. अशीच एक पार्टी चित्रपट निर्माता करण जोहरच्या घरीही झाली होती. मात्र, करण जोहरचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.