सेलिब्रिटी कुटुंबातील 'या' हसऱ्या मुलाचा आज 53 वा वाढदिवस! तब्बल 12 वर्षांनी मोठ्या मुलीशी लग्न आणि...

Bollywood News : हा हसरा आणि गोंडस मुलाचा आज 53 वा वाढदिवस आहे. 12 वर्षं मोठ्या नायिकेशी लग्न मग घटस्फोट, दुसरं लग्न तेदेखील एका प्रसिद्ध अभिनेत्री.

नेहा चौधरी | Updated: Aug 16, 2023, 09:43 AM IST
सेलिब्रिटी कुटुंबातील 'या' हसऱ्या मुलाचा आज 53 वा वाढदिवस! तब्बल 12 वर्षांनी मोठ्या मुलीशी लग्न आणि... title=
saif ali khan birthday cute childhood photo love life saif ali khan unknown facts in marathi

Bollywood News : सेलिब्रिटी कुटुंबातील हा चिमुकला आज त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करतोय. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या लेकीचा वाढदिवस साजरा केला. तब्बल 12 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी लग्न, मुलगी आणि मुलगा असं सुंदर कुटुंबाला तडा गेला आणि त्याचा आयुष्यात दुसऱ्या अभिनेत्रीने एन्ट्री घेतली. आता ही अभिनेत्री त्यापेक्षा 10 वर्षांनी लहान... घटस्फोट घेऊन त्याने दुसरं लग्न केलं. त्याचा घरातील आई, बहीण, पत्नी आणि आता मुलगी सगळे सुपरस्टार...आता तरी तुमच्या लक्षात आलं का हा चिमुकला कोण आहे ते...नाही अजून एक हेन्ट देतो या अभिनेत्याचे वडील क्रिकेटर होते. 

हा आहे बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान (saif ali khan birthday). तुम्हाला आम्ही आहे सैफ हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर आणि भारतीय क्रिकेट मन्सूर अली खान यांचा मुलगा आहे. सैफ अली खानचा जन्म  16 ऑगस्ट 1970 ला दिल्लीत झाला होता. सैफ पतौडी संस्थानातील नवाब घराण्यातील आहे.  (saif ali khan birthday cute childhood photo love life saif ali khan unknown facts in marathi)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saif Ali Khan (@actorsaifalikhan)

सैफ अली खानबद्दल रंजक गोष्टी (saif ali khan Unknown Facts)

वाढदिवसानिमित्त आज आपण त्याचा अशा गोष्टी सांगणार आहोत, त्या नक्कीच तुम्हाला माहिती नसेल. शर्मिला टागोरचा मुलगा पहिल्या चित्रपटातून सैफ अली खानला काढण्यात आलं होतं. 1991 मध्ये दिग्दर्शक राहुल रवैल यांनी त्याच्या बेखुदी चित्रपटासाठी मुख्य अभिनेता म्हणून कास्ट केलं होतं. यात सैफ अली खानची अभिनेत्री होती काजोल. पण त्याचा अभिनय पाहून राहुल नाराज झाला आणि त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर कमल सदानाला अभिनेता म्हणून साइन करण्यात आलं. 

पण आज त्याचा अभिनयाची जादू सगळ्यांवर चालली आहे. सैफने क्राईम ड्रामा, अॅक्शन थ्रिलर, कॉमिक आणि रोमान्स सगळ्या प्रकारे रोल केले आहेत. एवढंच नाही अभिनय येत नाही म्हणून पहिला चित्रपटातून काढल्यानंतरही आज त्याने अभिनयाच्या जोरावर  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सात फिल्मफेअर सारखे पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. 2010 मध्ये सैफला चौथा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार पद्मश्री त्याला मिळाला आहे. सैफ अली खानने आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

लव्ह लाइफ चर्चेत

बॉलिवूडमध्ये आल्यानंतर सैफ अली खानची अमृता सिंगसोबत मैत्री झाली. दोघेही वरच्या वर एकमेकांना भेट होते. त्यांचा मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. 12 मोठ्या असलेल्या अमृताशी 1991 मध्ये सैफ अली खानने लग्न केले. या दोघांना सारा अली खान ही मुलगी जी आज एक सुपरस्टार आहे. तर एक मुलगा आहे. पण हे लग्न 10 वर्ष टिकलं. भांडण, घटस्फोट आणि पोटगी यासगळ्यांने सैफली खान चर्चेत होता. 

त्यानंतर बराच काळ सिंगल असणाऱ्या सैफच्या आयुष्यात करीना कपूरची एन्ट्री झाली. करीना सैफपेक्षा 10 वर्ष लहान, पण वयाची तमा न बाळगता ते एकमेकांच्या प्रेमात पडले.त्यानतंर पाच वर्षे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 16 ऑक्टोबर 2012 त्यांनी लग्न केलं. त्यांना आज तैमूर आणि जहांगीर असं दोन मुलं आहेत. 

हेसुद्धा वाचा - Mohnish Bahl : सलमान खानशी पंगा घेणारा मोहनीश बहल का नाही पाहायचा आईचे चित्रपट?

नबावची शानच काही और 

पतौडी पॅलेस हा 1900 मध्ये बांधण्यात आला होता. या राजवाड्याला इब्राहिम कोठी या नावानेही ओळखलं जातं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, हा पॅलेस 2005 ते 2014 पर्यंत नीमराना हॉटेल होतं. मात्र नबाव सैफने आज या राजवाड्याचा ताबा घेतला आणि त्याचं नूतनीकरण केलं.