कंगनाच्या वक्तव्यानंतर 'मुंबई'साठी एकवटले मराठी कलाकार

कृतज्ञता दाखवता येत नसेल तर कृतघ्न तरी होऊ नका. 

Updated: Sep 4, 2020, 02:33 PM IST
कंगनाच्या वक्तव्यानंतर 'मुंबई'साठी एकवटले मराठी कलाकार title=

मुंबई : कंगनाच्या वक्तव्यानंतर 'मुंबई'साठी एकवटले मराठी कलाकार मुंबई : मुंबईत असुरक्षित वाटल्याची भावना व्यक्त करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतवर चहुबाजुंनी टीका होत आहे. 'मुंबई'वर मनापासून प्रेम करणाऱ्या मराठी कलाकार कंगनाच्या या विरोधात एकवटले आहेत. मराठी कलाकारांनी कंगनाला आपल्या ट्विटच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं आहे.

सई ताम्हणकरने आपल्या ट्विटमध्ये फक्त,'मुंबई मेरी जान!' असं म्हणतं #कर्मभूमी #ILoveMumbai #विषयसंपला हे हॅशटॅग वापरले आहेत. (मुंबईबद्दलच्या विधानावर कंगनाला रेणुका शहाणेंचे खडेबोल) 

 

ज्या मुंबईत स्वतःच करियर बनवलं त्या मुंबईलाच पाकिस्तान म्हणताना तुला लाज कशी नाही वाटली?, असा प्रश्न अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी विचारला आहे.(ऊर्मिला मातोंडकर यांनी कंगना राणौतला चांगलेच खडसावले) 

ज्या शहराने नाव दिलं, ओळख दिली, मान दिला आणि जगण्याला अर्थ दिला त्या माझ्या मुंबई शहराचा मला अभिमान आहे. जे जे आले त्यांना सामावून घेण्याचा मोठेपणा दाखवाला आहे या शहराने. कृतज्ञता दाखवता येत नसेल तर कृतघ्न तरी होऊ नका. #ILoveMumbai

जिस थाली में खाना उसी मे छेद करना. आमच्या मराठीत पण अशीच एक म्हण आहे.....ज्या ताटात खातात त्यातच *****मुंबई आमचं प्रेम आहे. विषयच नाही !!!! असं म्हणत अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने ट्विट केलं आहे.

कंगना हिने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यामुळे आता सोशल मीडियावर तिच्यावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. या वादात आता अभिनेता रितेश देशमुख यानेही उडी घेतली आहे. रितेश देशमुख याने कंगनाला थेट प्रत्युत्तर दिले नसले तरी त्याने सूचक अशी टिप्पणी केली आहे. 'मुंबई हिंदुस्तान है' असे त्याने म्हटले आहे.