मुंबई : 'ज्या शहरानं तुझं बॉलिवूड स्टार होण्याचं स्वप्न पूर्ण केलं, त्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी कशी करू शकतेस? उचलली जीभ लावली टाळ्याला... अशा शब्दांत सिने अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही अभिनेत्री कंगना राणौतचे वाभाडे काढलेत.
कंगना राणौतने मुंबईची स्थिती ही पाकव्याप्त काश्मीरसारखी POK झाल्याचे वक्तव्य केले होते. काही दिवसांपूर्वी कंगना राणौत हिने मला मुव्ही माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत असल्याचे म्हटले होते. यावरून संजय राऊत यांनी कंगनाला फटकारले होते. तुम्हाला मुंबई पोलिसांविषयी विश्वास नसेल, इतर राज्यातील पोलिसांची सुरक्षा हवी असेल तर तुम्ही आपल्या राज्यात निघून जावे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. (ऊर्मिला मातोंडकर यांनी कंगना राणौतला चांगलेच खडसावले)
Dear @KanganaTeam Mumbai is the city where your dream of becoming a Bollywood star has been fulfilled, one would expect you to have some respect for this wonderful city. It's appalling how you compared Mumbai with POK! उचलली जीभ आणि लावली टाळ्याला https://t.co/FXjkGxqfBK
— Renuka Shahane (@renukash) September 3, 2020
कंगनाच्या या वक्तव्यावरून तिच्यावर आता टिकेची झोड पडत आहे. बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीतूनही कंगनाला सडेतोड उत्तर मिळत आहे. मुंबईला 'स्वप्ननगरी' म्हणतात. प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करायला मुंबई मदत करत असते. एका तासाच्या फरकाने रेणुका शहाणे यांनी दुसरं ट्विट देखील केलं आहे. (मुंबईला POK म्हणणारी कंगना पुन्हा चवताळली, टीका करणाऱ्यांवर पलटवार)
Dear @KanganaTeam I am all for criticizing Govts. But "why Mumbai is feeling like POK" seems to me like a direct comparison between Mumbai & POK. Your comparison was really in bad taste. As a Mumbaikar I did not like it! Maybe it was naive of me to expect any better from you. https://t.co/E9feLKsurv
— Renuka Shahane (@renukash) September 3, 2020
यामध्ये त्यांनी म्हटलंय,'माझ्यासकट सर्वच सरकारवर टीका करत असतो. पण "मुंबईत तुला पीओके सारखं का वाटत आहे?". मुंबई आणि पीओके यांच्यात थेट तुलना. तु केलेल्या तुलनेला काही अर्थ नाही. मुंबईकर म्हणून मला ही गोष्ट पटलेली नाही. तुझ्याकडून आणखी काही चांगल्याची अपेक्षा करणंच कदाचित चुकीचं आहे.'
या मुंबईत काम करूनच आपली ओळख निर्माण करणाऱ्या कंगनावर सध्या सर्वच बाजूंनी टीका होत आहे. ट्विटरवरून देखील तिला यावरून युझर्सचे प्रत्युत्तर मिळत आहे.