सचिन तेंडूलकरची लेक गेलीये 'या' खास व्यक्तीसोबत वेकेशनवर

साराने शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कधी टीम इंडियाचा हँडसम क्रिकेटर शुभमन गिल सोबतच्या कथित अफेअरच्या चर्चांमुळे तिचं नाव समोर येतं. तर कधी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एखाद्या फोटो किंवा व्हिडीओमुळे ती ट्रेंड होते. अशातच आता सारा तेंडुलकरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सारा पुन्हा एकदा चर्चेत आलीये.

Updated: Aug 18, 2023, 08:43 PM IST
सचिन तेंडूलकरची लेक गेलीये 'या' खास व्यक्तीसोबत वेकेशनवर title=

मुंबई : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. कधी टीम इंडियाचा हँडसम क्रिकेटर शुभमन गिल सोबतच्या कथित अफेअरच्या चर्चांमुळे तिचं नाव समोर येतं. तर कधी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एखाद्या फोटो किंवा व्हिडीओमुळे ती ट्रेंड होते. अशातच आता सारा तेंडुलकरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सारा पुन्हा एकदा चर्चेत आलीये. नुकतीच सारा वेकेशनला गेली आहे. तिच्या वेकेशनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. समोर आलेल्या व्हीडिओत ती एका खास व्यक्तीसोबत दिसत आहे.

साराने शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेअर केलेल्या व्हिडीओत सारासोबत दुसरं तिसरं कोणी नसून तिची जवळची मैत्रिणी दिसत आहे. दोघंही एका पार्कमध्ये दिसत आहे. जिथे त्या डुकरांसोबत खेळताना दिसत आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका युजर्सने कमेंट करत लिहीलं की, किती गोड आहे ही मुलगी. तर अजून एकाने म्हटलंय सारा आम्हाला तु खूप आवडतेस. तर अजून एकाने म्हटलंय, आम्हाला तुला सिनेमात पाहायला आवडेल. तर अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत हार्ट ईमोजी शेअर केले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून सारा तेंडुलकरचं नाव टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिलसोबत  जोडलं जातंय. हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. सारा नुकतंच केनियाला सुट्टीचा आनंद घ्यायला गेली होती. यानंतर ती पुन्हा मुंबईत परतली आहे. अशामध्ये वांद्रेतील एक रेस्टॉरंट बाहेर सारा स्पॉट झाली होती. सारा तेंडूलकरही सचिन तेंडुलकर यांची मुलगी आहे. तिचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडत असतं. तिने कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर करताच तो सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतो. पुन्हा एकदा ती याच व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. तिचा गोड व्हिडीओ पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. याचबरोबर चाहते तिला सिनेमात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकदा ती बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार असल्याचीही चर्चा होती.