Sara Tendulkar: सारा तेंडुलकरची 2023 ची Bucket List तयार, यादीत लग्नाचाही समावेश?

2023 Planner: सारा तेंडुलकरने नव्या वर्षाची म्हणजे 2023 चा प्लानर तयार केला आहे, सोशल मीडियावर तीने एक व्हिडिओ शेअर केला असून यावर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत

Updated: Dec 17, 2022, 09:24 PM IST
Sara Tendulkar: सारा तेंडुलकरची 2023 ची Bucket List तयार, यादीत लग्नाचाही समावेश? title=

Sara Tendulkar share 2023 Planner: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच सक्रीय असते. आता साराने सोशल मीडियावर नव्या वर्षातला (New Year) म्हणजे 2023 साठी एक प्लानर शेअर केला आहे. साराने एक व्हिडिओ (Video) तयार केला असून आपण स्वत: हा प्लानर तयार केल्याचं तीने म्हटलं आहे. सारा तेंडुलकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) एक पोस्ट शेअर केली आहे. यात तीने एक व्हिडिओही टाकला आहे. सारा तेंडुलकरने 2023 चा प्लानर शेअर केल्यानंतर त्यावर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. यातच एक चर्चा अशीही सुरु झाली आहे, नव्या वर्षात सारा लग्न करणार का?

2023 चा प्लानर
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तीने '2023 चा प्लान अखेर तयार आहे, आणि मी आपला उत्साह रोखू शकत नाही' असं म्हटलं आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला नवा प्लानर खरेदी करण्याचा आनंद काही औरच असतो. यावर्षी हा आनंद 10 हजार पटीने वाढला आहे कारण मी स्वत:चा प्लानर तयार केला आहे. तुम्ही माझ्यासाखेच असाल आणि तुम्हाला तुमच्या आगामी योजना आखण्याची आवड असेल तर मी तुमच्यासाठी नवी गोष्ट घेऊन आली आहे' असं साराने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

सारा तेंडुलकरच्या पोस्टचा अर्थ काय?
वास्तविक, सारा तेंडुलकरने एक स्टार्टअप सुरु केला असून याअंतर्गत तीने डायरी छापली आहे. ही लिमिटेड एडिशन असून यात तीने हाताने लिहिलेल्या काही नोट्स आहेत. यासाठी तीने एक बेवसाईटही तयार केली असून Sara Tendulkar.in असं त्याचं नाव आहे. या बेवसाईटवर ही डायरी विक्रीसाठी उपलब्ध असून त्याची किंमत 2,499 रुपये इतकी आहे. नव्या वर्षात तुम्ही काय करणार, कोणता संकल्प करणार, याची नोंद या डायरीत करण्याचं आवाहन तीने केलं आहे. 

काळ्या रंगाही डायरी साधी आणि आकर्षक आहे. केवळ 2023 असं यावर लिहिलेलं आहे. साराने शेअर केलेल्या व्हिडिओत ती डायरीत काहीतरी लिहिताना दिसत आहे. साराच्या या इन्स्टा पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी साराच्या नव्या बिझनेसचं कौतुक केलं आहे, तर काही जणांनी डायरीची किंमत खूपच जास्त असल्याचं म्हटलं आहे.

सारा तेंडुलकरचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स
साराने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. यानंतरचं शिक्षण तिने लंडनमधील विद्यापिठात घेतलं आहे. साराच्या नावाबद्दल खूप मजेशीर गोष्ट आहे. सहारा कपमध्ये शानदार खेळ खेळल्यानंतर सचिन तेंडुलकरने मुलीचं नाव सारा असं ठेवलं. या सामन्यात सचिन कॅप्टन होता. सोशल मीडियावर सारा मोठमोठ्या कलाकारांना टक्कर देते. इंस्टाग्रामवर साराचे 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. यावरून साराच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो.  सारा, लोकप्रिय गायक जस्टिन बीबरची खूप मोठी चाहती आहे. 2013 मध्ये जस्टिनने साराला वाढदिवसाचं खास सरप्राईज दिलं होतं. साराने जस्टिनने दिलेल्या सरप्राईजचा व्हिडिओ शेअर केला होता.