गोलमालच्या चौथ्या सिक्वेलमध्ये झळकणार सचिन खेडेकर

गोलमाल चित्रपटाचा चौथा भागही लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित पहिल्या तिन्ही भागांनी रसिकांचे मनोरंजन केले. त्यामुळे चौथ्या सिक्वेलमध्येही नेमके काय पहायला मिळणार याची रसिकांना आतुरता आहे. 

Updated: Sep 20, 2017, 11:06 PM IST
गोलमालच्या चौथ्या सिक्वेलमध्ये झळकणार सचिन खेडेकर  title=

मुंबई : गोलमाल चित्रपटाचा चौथा भागही लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित पहिल्या तिन्ही भागांनी रसिकांचे मनोरंजन केले. त्यामुळे चौथ्या सिक्वेलमध्येही नेमके काय पहायला मिळणार याची रसिकांना आतुरता आहे. 

कॉमेडीप्रमाणेच गोलमालमधील कलाकारही हा चित्रपटाचा अविभाज्य भाग आहेत. अजय देवगण, तुषार कपूर, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, जॉनी लिव्हर, कुणाल खेमु यांसारखे गोलमाल 3 मधील कलाकार आपल्याला या चौथ्या भागातही पाहायला मिळणार आहेत. करिना कपूरऐवजी गोलमालच्या चौथ्या भागात तब्बू झळकणार आहे. पण या तगड्या कलाकारांबरोबरच मराठी सिनेमातील 'बाप' कलाकार सचिन खेडेकरही एका विशेष भूमिकेत दिसणार आहेत. 

सचिन खेडेकरांनी यापूर्वी रोहित शेट्टीच्या सिंघम चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यामुळे पुन्हा रोहित सोबत एका सुपरहीट सिनेमाच्या सिक्वेलचा भाग होणं फारच सुखद अनुभव असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 
गोलमाल 4 या चित्रपटाचे नाव गोलमाल अगेन असे असून आमिर खानच्या सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटाला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टक्कर देणार आहे.