#Darlings...'साहो' आलाय तुमच्या भेटीला

पाहा जबरदस्त ऍक्शन असणारा 'साहो'चा टीझर 

Updated: Jun 13, 2019, 01:23 PM IST
 #Darlings...'साहो' आलाय तुमच्या भेटीला  title=

मुंबई : बॉलिवूड आणि टॉलिवूडमधून धमाकेदार चित्रपट 'साहो' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'साहो' चित्रपटाच्या घोषणेनंतरच चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर बहुचर्चित 'साहो'चा टीझर  आज प्रदर्शित करण्यात आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा 'बाहुबली'फेम अभिनेता प्रभास एका वेगळ्या अंदाजात चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'साहो'मध्ये प्रभाससोबत बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर स्क्रिन शेअर करणार आहे. 

'साहो'मधून श्रद्धाने तेलुगू सिनेसृष्टीतही पदार्पण केलं आहे. सुजीथ यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'साहो' हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या टीजरमध्ये जबरदस्त अॅक्शनसह प्रभास आणि श्रद्धाची केमिस्ट्री पाहण्याची संधीही प्रेक्षकांना मिळणार आहे. 

 
 
 
 

A post shared by Prabhas (@actorprabhas) on

प्रभास आणि श्रद्धाव्यतिरिक्त चित्रपटात जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे आणि नील नितिन मुकेश अशी तगडी स्टारकास्टही भूमिका साकारणार आहे. टीझरमधून या कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन सीन दाखवण्यात आले आहेत. गाड्या, हवा, पाणी, रेगिस्तान अशा सर्वांचाच मेळ टीझरमध्ये दिसत आहे.

'साहो' येत्या 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'बाहुबली 2' नंतर 'साहो' प्रभासचा पहिलाच चित्रपट आहे. 'बाहुबली 2'च्या जबरदस्त कमाईनंतर आता 'साहो' बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.