Russia Ukraine war : रॉकेट हल्ल्यात लोकप्रिय अभिनेत्रीचा करुण अंत

आता एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. 

Updated: Mar 18, 2022, 03:22 PM IST
Russia Ukraine war : रॉकेट हल्ल्यात लोकप्रिय अभिनेत्रीचा करुण अंत  title=

नवी दिल्ली : जवळपास 22 हून अधिक दिवसांपासून सुरु असणाऱ्या रशिया – युक्रेन युद्धाला पूर्णविराम केव्हा मिळणार, याकडेच साऱ्या जगाचं लक्ष लागलं आहे. दर दिवशी युक्रेनमध्ये रशियाकडून किती नुकसान झालं याच्य बातम्या मन सुन्न करुन जातात. ज्यानंतर आता एक हादरवणारी बातमी समोर आली आहे.

युक्रेनची लोकप्रिय अभिनेत्री ओक्साना श्वेत्स यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. किव्ह येथील एका निवासी इमारतीवर रशियाकडून रॉकेट हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये ओक्साना यांचा करुण अंत झाल्याची माहिती हाती आली आहे.

यंथ थिएटर या लोकप्रिय नाट्य गटाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. ओक्साना 67 वर्षांच्या होत्या. त्यांना कला क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारांन गौरवण्यात आलं होतं.

द सीक्रेट ऑफ सेंट पॅट्रिक, टुमॉरो विल बी टुमॉरो आणि द रिटर्न ऑफ मुख्तार हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. अतिशय हृदयद्रावक आणि धडकी भरवणाऱ्या घटनेमध्ये ओक्साना यांचा अंत झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली.

Russia Ukraine War: रूसी हमले में यूक्रेन की मशहूर एक्ट्रेस की मौत, कीव में हुआ भयंकर रॉकेट हमला

आमच्या देशात आलेल्या या शत्रूला माफी नाही, अशा शब्दांत यावेळी ओक्साना यांच्या नाटकाच्या गटानं झाल्या प्रकरणाचा निषेध करत या महान अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली.