मुंबई : सेलिब्रिटींच्या एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ते प्रकाशझोतात येतात. पण, त्यापलीकडे हीच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही तितकीच जास्त चर्चेत असतात. अशाच सेलिब्रिटींमध्ये सध्या एका सेलिब्रिटी जोडीने सर्वांचच लक्ष वेधलं आहे.
ती जोडी म्हणजे अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री किम शर्मा.
किम आणि हर्षवर्धन या दोघांनाही बऱ्याचदा एकत्र पाहिलं गेलं आहे. पण, तरीही त्या दोघांनी कधीच आपल्यातील नात्याविषयी भाष्य केल्याचं पाहायला मिळालं नाही.
किम आणि हर्षवर्धनने त्यांच्या नात्याविषयी कितीही गोपनीयता पाळली तरीही माध्यमांसमोर त्यांचं असं वावरण काही लपून राहिलेलं नाही.
सध्या सोशल मीडियावर ही जोडी चर्चेत आली आहे ते म्हणजे एका व्हिडिओमुळे. ज्यामध्ये किम आणि हर्षवर्धन हे दोघंही बाईक राईडचा आनंद घेताना दिसत आहेत.
मुख्य म्हणजे आपली एक झलक टीपण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींची होणारी गडबड पाहता किमही त्यांच्याशी काही संवाद साधताना दिसत आहे.
'मोहोब्बते' फेम किम शर्माच्या खासगी आयुष्याविषयी सांगावं तर, काही वर्षांपूर्वीच तिने केन्याच्या एका व्यावसायिकाशी लग्न केलं होतं. तिचं हे वैवाहिक नातं फार काळ टिकू शकलं नव्हतं.
याशिवाय क्रिकेटर युवराज सिंहशीसुद्धा ती रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं गेलं आहे. हर्षवर्धनपूर्वी तीन- चार रिलेशनशिपमुळे चर्चेत असणारी किम आता येत्या काळात या नात्याविषयी काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.