Rubina Dilaik slams netizens : या दिवाळीत लोकांना खूप फटाके फोडले. त्यामुळे हवेचं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यात दिल्लीचं वातावरण तर खूप खराब झालं आहे. फक्त दिल्ली नाही तर इतर शहरांमध्ये देखील तेच दृष्य आहे. यावरून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलैकनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये रुबीनानं फटाके न फोडण्याची विनंती जनतेला केली. हवेच्या प्रदूषणासोबतच ध्वनीच्या होणाऱ्या प्रदूषणच्या विरोधात रुबीना उभी राहिली आहे. त्यामुळे आता तरी फटाके फोडणं बंद करा असं तिनं म्हटलं तर त्यावरून नेटकऱ्यांनी रुबीनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
रुबीना दिलैकच्या मॅटर्निटी फोटोशूटनंतर सगळे रुबीनाची स्तुती करत होते तर दुसरीकडे आता लोक तिला ट्रोल करत आहेत. खरंतर रुबीनानं 15 नोव्हेंबर भाऊबीजच्या दिवशी दुपारी 2.45 वाजता एक ट्वीट केलं होतं. यात लिहिलं होतं की 'जी कोणी व्यक्ती या सगळ्या संबंधीत आहे त्यांच्यासाठी माझी ही पोस्ट आहे. दिवाळी संपली आहे. फटाके फोडणं बंद करा. 10 नोव्हेंबर पासून सकाळी 3 वाजेपासून सतत फटाके फोडण्यात येत आहे. आता खूप झालं. हवेचं प्रदूषण तर होतच आहे... ध्वनी प्रदूषण तर आहेच त्याच्यासोबत ध्वनी प्रदूषणनं आमची झोप उडवली आहे.'
Diwali, is a festival of lights , celebration of Shree Ram returning to Ayodhya !Well, Ramayan mein bursting crackers for 10days was never mentioned , So all you Pseudo Hindu propaganda agents , Go and find someone ELSE to highlight your paid accounts and fake ids! Dare NoT https://t.co/QJakYtN4ZE
— Rubina Dilaik (@RubiDilaik) November 15, 2023
रुबीनाच्या त्या ट्वीटवर अनेकांनी तिला ट्रोल करत 'अॅन्टी हिंदू' म्हटलं. तिला काहीही बोलण्यास सुरुवात केली. त्यासोबत तिच्याकडे तिनं केलेलं हे ट्वीट डिलिट करण्याची देखील डिमांड केली. एका नेटकऱ्यानं लिहिलं की 'तुझं अॅन्टी हिंदू प्रोपेगेंडा असलेलं ट्वीट लवकरच डिलीट करा. हिंदू सणांच्या दिवशी ज्ञान देणं बंद करा.' त्यावर आता रुबीनानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. रुबीना म्हणाली, 'माझ्या इन्स्टाग्रामवर कमेंट करायला जाऊ नका. हे कोणतंही ज्ञान नाही आहे. श्रीमान बुद्धिमान बेवकूफ विपुल श्रीसथ. सणांना तुमच्यापेक्षा जास्त आम्ही मानतो. पण दुसऱ्यांना त्रास देत नाही.'
त्यानंतर रुबीनानं ट्रोलिंगवर आणखी एक ट्वीट केलं. त्यात तिनं लिहिलं की 'दिवाळी, हा प्रकाशाचा सण आहे. श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले होते तेव्हा उत्साह साजरा करण्यात आला होता. हा तोच सण आहे. पण जाऊद्या, रामायणात 10 दिवस फटाके फोडण्याचा उल्लेख कधीच करण्यात आला नाही, त्यामुळे तुम्ही सगळे छोटे हिंदू प्रोपेगेंडा एजंट्स, जा आणि तुमचे पेड अकाऊंट्स आणि खोटे आयडीला हायलाईट करण्यासाठी कोणा दुसऱ्याला शोधा! माझ्यासोबत वाद घालण्याची हिंम्मत करू नका.' याशिवाय रुबीनाला तिचा पती अभिनव शुक्लानं देखील पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा : डेविड बेकहॅमसोबत 'फेक हाइट' मुळे अर्जुन कपूर ट्रोल, नेटकऱ्यांना अभिनेत्यानं असं दिलं सडेतोड उत्तर
रुबीनाच्या घरी लवकरच एका पाहुण्याचे आगमन होणार आहे. रुबीना प्रेग्नंट आहे आणि काही काळातच तिच्या घरी बाळाचे आगमन होणार आहे. त्यामुळे ती सध्या खूप काळजी घेत आहे. रुबीनानं प्रेग्नंसीची घोषणा करण्याआधी देखील तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांनी ती प्रेग्नंट असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यात किती तथ्य आहे हे जो पर्यंत रुबीना आणि तिच्या पतीच्या घोषणेनंतर त्यावर सगळ्यांचा विश्वास बसला.