Rohit Shetty Father : गेल्या दशकभराहूनही अधिक काळ हटके आणि स्टंटबाजीचे चित्रपट देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी हा सर्वांचाच लाडका बनलेला आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. अशाच आता चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या वडिलांची म्हणजेच M.B.Shetty यांची अनेकांना माहिती नसेल परंतु त्याचे वडीलही सुप्रसिद्ध स्टंटमन होते. त्यांचीही सर्वत्र लोकप्रिय चर्चा होती. 1982 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला परंतु त्यांची क्रेझ त्यांच्या चाहत्यांमध्ये आजही आहे. रोहित शेट्टीही एकप्रकारे त्याच्या वडिलांची लेगसी पुढे नेताना दिसतो आहे. मागच्या वर्षी त्याचा 'सर्कस' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामुळे त्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली होती. या चित्रपटानंही बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.
रोहित शेट्टी आणि त्याच्या वडिलांबद्दल अनेकांना माहिती नसेल परंतु त्यांचीही एक हळवी गोष्ट आहे जी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. एम. बी. शेट्टी हे लोकप्रिय खलनायक होते. नायकांपेक्षाही जास्त हे लोकप्रिय होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ते एक लोकप्रिय स्टंटमन होते आणि सोबत फाईट इंस्ट्रक्टरही होते. त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांतून आणि मोठ्या नायकांसोबत, खलनायकांसोबत काम केली आहेत. त्यामुळे त्यांची तेव्हा लोकप्रियताही अफाट होती. आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. ते स्वत: एक स्टंटमन होतेच. त्यामुळे आपल्याला हे वाटतं असेलच की ते मनानंही तसेच गंभीर असतील. ते होतेच परंतु त्यांच्या आयुष्यात असाच एक प्रसंग घडला होता ज्यामुळे ते पुर्णत: खचले होते.
हेही वाचा - प्राजक्ता झाली Engineer; पोस्ट शेअर केल्यावर चाहते म्हणाले, 'नोकरीसाठी अर्ज कर'
एम.बी. शेट्टी हे अत्यंत गरीब कुटुंबातून आले होते. त्यातून त्यांनी उडूपीवरून मुंबई गाठली होती. ते पहिल्यांदा वेटर म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांची ओळख ही बॉक्सिंग आणि बॉडी बिल्डिंगशी झाली. 1956 च्या हीर या चित्रपटातून त्यांनी फाईट इंस्ट्रक्टर म्हणून आपल्या कामाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी धर्मेंद्र, अमिताभ बच्चन अशा अनेक कलाकारांसोबत काम केले होते. परंतु यशाच्या शिखरावर असताना त्यांच्या आयुष्यात असं काही घडलं की त्यांचे आयुष्य पुर्णपणे बदलून गेले.
हेही वाचा - Oops! अल्लू अर्जूनच्या मुखी 'पुष्पा 2' चा डायलॉग? Leak झाला ना राव; पाहा video
1980 साली ते यशाच्या शिखरावर होते. तेव्हा ते बॉम्बे 405 माईल्स या चित्रपटात काम करत होते. या चित्रपटात झीनत अमान, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा प्रमुख भुमिकेत होते. यावेळी एक स्टंट सीन होता. हा सीन शुट होत असतानाच त्यांचा स्टंटमॅन मन्सूरला गॅस पंपावर उडी मारावी लागणार होती. परंतु तेव्हा अंदाज चुकला आणि अपघात झाला त्यात बिचाऱ्या मन्सूरला आपला जीव गमवावा लागला. याचा त्यांच्या मनावर वाईट परिणाम झाला. ते बंगल्यातून रस्त्यावर आले होते. ते पुर्णत: नैराश्यात गेले होते. त्यानंतर हा मानसिक धक्का पचवता न आल्यानं त्यांनी पुढील काही वर्षातच जगाचा निरोप घेतला.