'हॅरी पॉटर' फेम रॉबी कोलट्रेन यांनी घेतला जगाचा निरोप

दिग्गज अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप, सिनेसृष्टीवर पसरली शोककळा!  

Updated: Oct 15, 2022, 01:10 AM IST
'हॅरी पॉटर' फेम रॉबी कोलट्रेन यांनी घेतला जगाचा निरोप title=

Robbie Coltrane Passed Away : हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट हॅरी पॉटरमध्ये रुबस हॅग्रिडची भूमिका करणारा सुपरस्टार रॉबी कोल्ट्रेन यांचं निधन झालं आहे. रॉबी कोलट्रेन यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रॉबी कोलट्रेन यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. (Robbie Coltrane Passed Away Marathi News)

स्कॉटलंडमधील लार्बर्ट इथल्या त्यांच्या घराजवळील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. रॉबी कोलट्रेनची प्रकृती दोन-तीन दिवसांपासून खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे रॉबी कोलट्रेनवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

रॉबी कोलट्रेन यांच्या निधनामुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. 'हॅरी पॉटर' या चित्रपटात रॉबी कोलट्रेनच्या माध्यमातून साकारलेली हॅग्रीडची व्यक्तिरेखा खूप चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं आणि सर्वांना खूप आवडली होती. 

रॉबी कोलट्रेनचा जन्म 30 मार्च 1950 रोजी ग्लासगो, स्कॉटलंड इथं झाला होता. त्याचं खरे नाव अँथनी रॉबर्ट मॅकमिलन होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा रॉबी यांनी अभिनयात नशीब आजमावले तेव्हा त्यांना खूप संघर्ष करावा लागला. इंडस्ट्रीत अपयश आल्यानंतर त्यांनी क्लबमध्ये स्टँड-अप कॉमेडी करायला सुरुवात केली. कोलट्रेन यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला टीव्ही मालिकेतून सुरुवात केली. चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी त्याने फ्लॅश गॉर्डन, ब्लॅकॅडर आणि कीप इट इन द फॅमिली सारख्या शोमध्येही काम केलं. याशिवाय ते 'ए किक अप द एट्स', 'द कॉमिक स्ट्रिप' आणि 'अल्फ्रेस्को' सारख्या कॉमेडी शोमध्येही दिसले होते.

रॉबी कोलट्रेन यांचे लक्षात राहणारे चित्रपट
केवळ हॅरी पॉटरच नाही तर असे अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिका होत्या, ज्यात रॉबी कोल्ट्रेनने आपल्या शानदार अभिनयाची ओळख करून दिली. हॅरी पॉटर व्यतिरिक्त, रॉबी कोलट्रेनने जेम्स बाँड (गोल्डन आय), नॅशनल ट्रेझरी आणि टीव्ही शो क्रॅकरमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. रॉबी कोलट्रेन यांच्या निधनाबद्दल त्याचे सर्व चाहते सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.