''...पिस्ता तो आदमीही हैं'' जेनेलिया आणि रितेशच्या 'त्या' Funny Couple Video नं चाहते पोटभरून हसले

Ritiesh Deskmukh and Genelia Deshmukh: सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त ट्रेण्डिंग कपल कोण असेल तर ते म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला दिसतो आहे. अवघ्या काही तासातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 8, 2023, 10:29 PM IST
''...पिस्ता तो आदमीही हैं'' जेनेलिया आणि रितेशच्या 'त्या' Funny Couple Video नं चाहते पोटभरून हसले title=
July 8, 2023 | Ritiesh Deskmukh and Genelia Deshmukh new couple video goes viral on instagram (Photo: Ritiesh Deskmukh | Instagram)

Ritiesh Deskmukh and Genelia Deshmukh: अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. त्यांचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. आपल्या कपल व्हिडीओसाठीही ते दोघं कायमच चर्चेत असतात. सध्या ट्रेण्ड आहे तो म्हणजे सोशल मीडियाचा. तेव्हा आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून रील्स आणि फनी व्हिडीओ व्हायरल करण्याचा चांगलाच ट्रेण्ड आहे. त्यामुळे सध्या सेलिब्रेटीही आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून रील्स आणि व्हिडीओ हे व्हायरल करताना दिसतात. त्यांच्या या व्हिडीओजना त्यांच्या चाहत्यांकडून तूफान लाईक्स आणि व्हूयज मिळताना दिसतात. रितेश आणि जेनेलियाही सोशल मीडियावर ट्रेडिंग असतात. त्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काहीच तासात शेअर केलेल्या या व्हिडीओला प्रचंड लाईक्स मिळाले आहेत. 

सोशल मीडियावर ते दोघंही आपले इंटरेस्टिंग व्हिडीओज हे शेअर करताना दिसतात. आपल्या दैनंदिन आयुष्यातील व्हिडीओही ते पोस्ट करताना दिसतात. सध्या त्यांनी असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या ओडिओमध्ये हिंदीमध्ये रितेश देशमुख म्हणतो, 'पत्नीया कितना भी काजू - बदाम खाये, पिस्ता आदमीही हैं' म्हणजेच 'बायकोनं कितीही काजू-बदाम खाल्ले तरीही पिस्ता आदमीही हैं याचा अर्थ ती नेहमी नवऱ्याचीच कोंडी करते' त्यांच्या या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रियाही येताना दिसत आहेत. या व्हिडीओत पुढे रितेश देशमुख बोलताना दिसतो आहे तर मागे उभी राहून जेनेलिया ही काजूची बॅग दातानं फोडताना दिसते आहे. 

सध्या या व्हिडीओला चाहत्यांचा तूफान प्रतिसाद मिळाला आहे. या व्हिडीओनं इन्टाग्रामवर चांगलाच भाव खाल्ला आहे. त्यामुळे सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा होताना दिसते आहे. रितेश - जेनेलिया आपले असे फनी व्हिडीओ कायमच शेअर करताना दिसतात आणि आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. सध्या त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही तूफान प्रतिक्रिया दिल्या आहेत. 4 तासात या व्हिडीओला 6 लाख व्हयूज मिळाले आहेत. त्यामुळे या व्हिडीओची चांगलीच चर्चा आहे. त्यांच्या चाहत्यांनीही यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा - Neetu Kapoor यांनी रणबीरसह केला वाढदिवस साजरा पण आलिया-राहा मात्र कुठे? सासुबाईंनी केलं Miss

पाहा व्हिडीओ - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका युझरनं कमेंट केली आहे की, 'पिस्ता आहात म्हणूनच खूप छान दिसत आहात. सर्व श्रेय फक्त बायकोलाच.' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, 'मला पण तुमच्यासारखी मॅरिड लाईफ हवी आहे.'