देशाप्रती प्रेम व्यक्त करणाऱ्या व्यक्तीच्या व्हिडिओवर रितेश भावूक

व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील.

Updated: Jan 28, 2020, 02:55 PM IST
देशाप्रती प्रेम व्यक्त करणाऱ्या व्यक्तीच्या व्हिडिओवर रितेश भावूक title=

मुंबई : रविवारी देशभरात ७१वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात आला. प्रत्येक नागरिकानं देशाप्रती आपलं प्रेम मोठ्या आदरानं व्यक्त केलं. शिवाय टीक-टॉक प्रेमींनी देखील अनोख्या शकली लढवत देशाविषयी आपलं प्रेम व्यक्त केलं. यावेळी भारताविषयी प्रेम व्यक्त करणारा एक व्हिडिओ पाहून अभिनेता रितेश देशमुख अत्यंत भावूक झाला. एवढचं नाही तर त्याने टीक-टॉक व्हिडिओ साकारणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर देखील मागितला. 

रोज आपण मनोरंजनासाठी टीक-टॉकवर अनेक व्हिडिओ पाहतो. परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर देखील शहारे उभे राहतील. २६ जानेवारीचे औचित्य साधत या अवलियाने एक व्हिडिओ पोस्ट केला. सध्या त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

व्हिडिओमध्ये दोन्ही पाय नसलेला व्यक्ती एका खांबावर चढताना दिसत आहे. विशेष म्हणजे नुसत्या खांबाला या व्यक्तीने झेंड्याचं रूप दिले आहे. हा व्हिडिओ पाहाताच रितेश भारावून गेला आणि त्याने त्या देशभक्ताच्या मोबाईल नंबरची मागणी केली.  

'जर ही गोष्ट तुम्हाला प्रेरणा देत नसेल तर तुमच्यासाठी यापेक्षा अधिक प्रेरणादायी काय असेल?' मी या व्यक्तीला सेल्यूट करतो.' अशा आशयाचं ट्विट रितेशनं केलं आहे. याआधी महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी देखील या व्हिडिओ संदर्भात ट्विट केलं होतं. 

आपण नेहमी आपल्याकडे नसलेल्या गोष्टींसाठी खंत व्यक्त करत असतो. जेवढं आहे त्यामध्ये आपण आपल्या आयुष्यात खुप काही करू शकतो असा धडा या देशभक्ताने देशाच्या प्रत्येक नागरिकाला दिला आहे.