अभिनेता रितेश देशमुख जेव्हा माधूरी दिक्षीतसोबत थिरकतो; पाहा व्हिडिओ

रितेश देशमुख आपल्या खास स्टाइलने सोशल मीडियावर अधिराज्य गाजवतो

Updated: May 15, 2022, 11:07 PM IST
अभिनेता रितेश देशमुख जेव्हा माधूरी दिक्षीतसोबत थिरकतो; पाहा व्हिडिओ title=

मुंबई : रितेश देशमुख आपल्या खास स्टाइलने सोशल मीडियावर अधिराज्य गाजवतो. त्याची स्टाईल चाहत्यांना आश्चर्यचकित करते. कधी तो पत्नीसोबत भांडताना दिसतो तर कधी आपल्या फनी स्टाइलने चाहत्यांना हसवताना दिसतो. त्याचबरोबर, नुकताच त्याचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रितेश देशमुख माधुरी दीक्षितसोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रितेश देशमुख माधुरी दीक्षितसोबत मखडा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स आणि स्टेप्स दोन्ही चाहत्यांना खूप आवडत आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्सचाही वर्षाव पाहायला मिळतोय. एका चाहत्याने कमेंट करत म्हणालं आहे की, भाऊ, वहिनी काय म्हणतील ते कर. तर दुसऱ्या चाहत्याने अप्रतिम डान्स. अशी कमेंट केलीये.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

माधुरी दीक्षित आज तिचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी तिने आपल्या सगळ्या खास पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे. माधुरीने तिच्या इंडस्ट्रीला बरीच वर्षे दिली आणि आज तिला धक धक गर्ल म्हणूनही ओळखलं जातं.