आलियासोबत नाही तर या व्यक्तीसोबत रणबीरचं लग्न करण्याची ऋषि कपूर यांची होती ईच्छा!

'शर्मा जी नमकीन' या चित्रपटाची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती.

Updated: Apr 1, 2022, 08:24 PM IST
आलियासोबत नाही तर या व्यक्तीसोबत रणबीरचं लग्न करण्याची ऋषि कपूर यांची होती ईच्छा! title=

मुंबई : 'शर्मा जी नमकीन' या चित्रपटाची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. ऋषी कपूर यांचा हा चित्रपट आता चाहत्यांच्या भेटीला आला आहे. हा ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटात परेश रावलही दिसणार आहेत. आज आम्ही या बातमीत या चित्रपटासोबत ऋषी कपूर यांच्याशी संबंधित काही मजेदार गोष्टी सांगणार आहोत.

बॉलिवूड स्टार  ऋषी कपूर यांनी आलिया आणि रणबीर या दोघांच्या नात्याबद्दल जेव्हा अफवा सुरू होत्या, तेव्हा ते म्हणाले होते की जे आहे ते, सर्वांना माहित आहे. एवढंच नव्हेतर जेव्हा ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होते, तेव्हा आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत न्यूयॉर्कला जायची.

ऋषी कपूर यांना रणबीर कपूरचं लग्न पाहायचं होतं
ऋषी कपूर यांना मृत्यूआधी मुलगा रणबीर कपूरचं लग्न पाहायचं होतं. पण हे होऊ शकलं नाही, त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली.

ऋषी कपूर यांनी आलियाचं केलं कौतुक 
'राझी' या चित्रपटासाठी ऋषी कपूर यांनी आलिया भट्टचं कौतुक केलं होतं. तसंच, त्यांनी हायवे चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचं कौतुक केलं.

आलियावर जोरदार टीका झाली
ऋषी कपूर यांनी २०२० मध्ये या जगाचा निरोप घेतला. ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आलिया हातात फोन घेऊन दिसली. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, त्यामुळे तिला खूप ट्रोलही करण्यात आलं होतं.

आलिया भट्टने ही गोष्ट ऋषी कपूरसाठी लिहिली आहे
ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर आलिया भट्टने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली.

रणबीर कपूरला आलियासोबत नाही तर यासोबत लग्न करायचं होतं
एकदा ट्विट करताना ऋषी कपूर यांनी गंमतीने रणबीर कपूर आणि अयान मुखर्जीबद्दल लिहिलं होतं की, बेस्ट फ्रेंड्स! आता दोघांनीही एकमेकांशी लग्न करावं? वेळ आली आहे!'