मुंबई : कॉमेडी आणि डबल मीनिंग डायलॉगबाजी करणारा यूट्यूबर भुवन बाम आता मोठ्या अडचणीत सापडला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) डोंगरी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याची दखल घेतली आहे आणि याप्रकरणी भुवनवर कारवाई करण्याबाबत दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. यासोबतच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयालाही कारवाईसाठी पत्र लिहिले आहे.
या संदर्भात, राष्ट्रीय महिला आयोगाने गुरुवारी नुकतेच एक ट्विट केले आणि म्हटले, "NCW India" ने याची दखल घेतली आहे. अध्यक्ष रेखा शर्मा यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून FIR नोंदवून याप्रकरणी कठोर कारवाई केली आहे. महिलांच्या प्रतिष्ठेचा भंग करणाऱ्या यूट्यूब चॅनलवर योग्य ती कारवाई करण्यासाठी (NCW) ने इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहिले असल्याचं देखील समोर येत आहे.
भुवन बामचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर हे प्रकरण उचलून धरले आणि हा व्हिडीओ महिलांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात असल्याचे सांगत तात्काळ कारवाईची मागणी केली.
ही क्लीप शेअर करताना पहाडी पांडा चॅनेलचा आशिष नौटियालने महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना विचारले आहे की,"भुवन बाम यांच्यावर महिलाविरोधी वक्तव्य केल्याबद्दल त्या कारवाई करू शकतात का?"
भुवन बामने 25 मार्च 2022 रोजी 'बीबी की वाइन्स' नावाच्या त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ अपलोड केला होता. 'ऑटोमॅटिक व्हेईकल' या नावाने अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये भुवन बाम त्याच्या वडिलांच्या गाडीच्या नावावर डबल मीनिंग गोष्टी बोलतो.
तो म्हणतो- "दोन लाखांचे बजेट माझे आहे. मला एक चांगले मॉडेल सांगा. यानंतर प्रश्न- उत्तरांचा खेळ सुरु असतो. या संवादादरम्यान 'पहाडन' हा शब्द येतो. मग व्हिडीओमध्ये 'कितना देती है'... 'पीछे से भी ले सक्ते है'... 'गिगोलो' असे शब्द वापरताना ऐकू येतात आणि त्याच्या याच व्हिडीओमुळे हा सगळा वाद उपस्थीत झाला आहे.