'या' फोटोशॉप केलेल्या फोटोमुळे ऋषी कपूर पुन्हा झाले ट्रोल

अभिनेते ऋषी कपूर, वाद विवाद आणि ट्विटर हे समीकरण जमलेले आहे.

Updated: Dec 25, 2017, 06:54 PM IST
'या' फोटोशॉप केलेल्या फोटोमुळे ऋषी कपूर पुन्हा झाले ट्रोल   title=

मुंबई : अभिनेते ऋषी कपूर, वाद विवाद आणि ट्विटर हे समीकरण जमलेले आहे.

अनेकदा सेलिब्रिटी  काही वादग्रस्त ट्विटवरून  ट्रोल होत असतात. या सेलिब्रिटींच्या यादीमध्ये हमखास असणारं एक नाव म्हणजे ऋषी कपूर. 

ऋषी कपूर पुन्हा झाले ट्रोल  

अभिनेते ऋषी कपूर यांचा ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न आज पुन्हा नव्या वादाचं कारणं ठरला आहे. ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी एका फोटोचा आधार घेतला होता. भारतातील विविधतेतील एकदा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न बुमरॅंगप्रमाणे पुन्हा त्यांच्यावर पलटला आहे.  

काय होते ट्विट  

ऋषी कपूर यांच्या ट्विटनुसार  त्यांनी एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये मुसलमान व्यक्ती आणि हिंदू व्यक्ती दिसत आहे. धर्माने वेगळे असणारे 'बॉटल'मुळे एकत्र येतात ... मेरी ख्रिसमस असे ऋषी कपूर यांनी ट्विट केले आहे. मात्र हा फोटो फोटोशॉप असल्याचे ट्विटरकरांनी म्हटले आहे.  

 

 

फेक फोटो 

ट्विटरकरांनी ऋषी कपूर यांचा फोटो फोटो शॉप केलेला असून खरा फोटो नेमका कोणता होता हेदेखील ट्विट करून दाखवले आहे. तसेच विनाकारण नकारात्मकता पसरवू नका अशा आशयाचा संदेशही लिहला आहे.  

सोशल मीडियावर ऋषी कपूर ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वीही अनेकदा ऋषी कपूर त्यांंच्या वक्तव्यावरून ट्रोल झाले आहेत.