...म्हणून ऋषी कपूर यांची मुलगी अंत्यदर्शनास मुकली

रिधिमा अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीत वेळेत पोहोचू शकली नाही. 

Updated: Apr 30, 2020, 08:15 PM IST
...म्हणून ऋषी कपूर यांची मुलगी अंत्यदर्शनास मुकली  title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्यावर मुंबईत चंदनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. ऋषी कपूर यांच्या अंतिम दर्शनासाठी रणबीर कपूर, नीतू सिंग, रणधीर कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, करिष्मा कपूर,अरमान जैन, आलिया भट्ट, अभिषेक बच्चन, आदर जैन ही मंडळी उपस्थित होती. ऋषी कपूर यांची मुलगी रिधिमा कपूर देखील दिल्लीहून निघाली होती. पण चार्टर प्लेनची परवानगी नाकारल्याने ती पोहोचू शकली नाही.

रिधिमा चार्टर प्लेनने मुंबईत पोहोचणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे तिला अंत्यदर्शन घेता येईल असे सांगितले जात होते. पण तसे झाले नाही. रिधिमा अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीत वेळेत पोहोचू शकली नाही. 

 
 
 
 

 
 
 

 
 
 
 
 
 

Papa I love you I will always love you - RIP my strongest warrior I will miss you everyday I will miss your FaceTime calls everyday! I wish I could be there to say goodbye to you ! Until we meet again papa I love you - your Mushk forever 

A post shared by Riddhima Kapoor Sahni (RKS) (@riddhimakapoorsahniofficial) on

मुंबईला जाण्यासंदर्भातील परवानगी तिला गृहविभागाकडून मिळाली होती. पण तिची चार्टर प्लेनची मागणी मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे ती रस्त्यामार्गे मुंबईला यावे लागत आहे. 

२०१८ मध्ये ऋषी कपूर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. मध्यंतरी त्यांनी परदेशात जाऊन उपचार करून घेतले होते. यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये ऋषी कपूर भारतात परतले होते. काही दिवसांपूर्वी श्वसनाच्या त्रासामुळे ऋषी कपूर यांना मुंबईच्या सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काहीवेळापुर्वीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

अजरामर भूमिका

ऋषी कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीत आदराने नाव घेतल्या जाणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक होते. आपले वडील राज कपूर यांच्या अभिनयाचा वारसा ऋषी कपूर यांनी समर्थपणे पुढे नेला. अवघ्या तीन वर्षांचे असताना ऋषी कपूर यांनी 'श्री ४२०' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम केले. तर राजकपूर दिग्दर्शित 'मेरा नाम जोकर'मधून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. यानंतर 'बॉबी' या चित्रपटाने ऋषी कपूर यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले.

मोठ्या पडद्यावर १९७० ते १९९० हा काळ ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयाने गाजवला. 'अमर अकबर अँथोनी', 'कुली', 'कर्ज' या चित्रपटांमधून त्यांनी एकाहून एक अशा सरस भूमिका साकारल्या. आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात ऋषी कपूर यांनी चरित्र अभिनेते म्हणून ओळख मिळवली. 'हम तुम', 'अग्निपथ', 'कपूर अँण्ड सन्स' या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.