ऋषी कपूरने चाहतीला रडवलं, पण रणबीरची माफी

 ऋषी कपूर रागावल्यानंतर रडकुंडीला आलेल्या एका युवतीला रणबीर कपूरने शांत केलं. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 13, 2018, 11:08 PM IST
 ऋषी कपूरने चाहतीला रडवलं, पण रणबीरची माफी title=

मुंबई : ऋषी कपूर रागावल्यानंतर रडकुंडीला आलेल्या एका युवतीला रणबीर कपूरने शांत केलं. अभिनेते ऋषी कपूर ट्विटरवर अनेक वेळा वादग्रस्त टवीट करतात. प्रत्यक्षातही त्यांचं वर्तन असंच असल्याचं एका चाहतीला दिसून आलं.

युवतीला सेल्फीचा मोह आवरला नाही

मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्तराँमध्ये, रणबीर कपूर वडील ऋषी कपूर, आई नीतू सिंग, बहीण आणि भाची समारा यांच्यासोबत डिनरला गेला होता. कपूर कुटुंब जेवत होतं. इतक्यात तेथे कपूर कुटुंबाला भेटण्याचा मोह एका फिमेल फॅनला आवरला नाही.

कपूर कुटुंबासोबत सेल्फी काढण्याची विनंती

तेव्हा एका तरूणीने, रेस्तराँमध्ये कुटुंबासोबत जेवायला आलेल्या कपूर कुटुंबासोबत सेल्फी काढण्याची विनंती केली. कपूर फॅमिलीतील प्रत्येकासोबत सेल्फी घेण्याची विनंती तिने केली. रणबीर आणि नीतू यांच्यासोबत तिने सेल्फी घेतले. मात्र घाई गडबडीत ऋषी कपूर यांच्याकडे तिचं लक्ष गेलं नाही.

'चिंटू' सरांसोबत सेल्फी काढला नाही

अचानक तिच्या लक्षात आलं की, 'चिंटू' सरांसोबत आपण सेल्फी काढला नाही, तिने ऋषी कपूरना विनंती केली.ती पुन्हा टेबलकडे आली. तेव्हा ऋषी कपूर म्हणाले, ही रिक्वेस्ट तर फक्त फॉर्मलटी आहे, पण ऋषी कपूर यांनी चक्क नकार दिला. मात्र ऋषी कपूर फोटोसाठी होकारच देणार, अशा विचाराने तिने मोबाईल हातात धरला होता.

अखेर चाहतीला रडू कोसळलं

'किती हा उद्धटपणा' असं नकारामुळे अवाक झालेली तरूणी बोलली. मात्र यामुळे ऋषी कपूर यांचा पारा अधिक चढला. ऋषी कपूर यांनी त्या तरुणीला तिथेच झापायला सुरुवात केली. अखेर चाहतीला रडू कोसळलं. हे पाहून रणबीरने मध्यस्थी केली. रणबीरने आधी तरुणीला शांत केलं, आणि तिची माफी मागितली. त्यानंतर ऋषी कपूर यांना गाडीकडे जाण्याची विनंती केली.

ऋषी कपूर यांचे अनेक ट्वीटस वादग्रस्त

प्रकरण शांत झालं असलं, तरी वडिलांच्या बेधडकपणामुळे रणबीरवरच माफी मागण्याची वेळ आली. ऋषी कपूर यांची आगपाखड यापूर्वी मीडियाने अनेक वेळा पाहिली आहे. त्यांच्या फटकळ ट्वीट्सच्या निशाण्यावर अनेक जण आले आहेत, आणि ते ट्वीटस वादग्रस्त देखील ठरले आहेत.