'मी फिलर्स आणि बोटॉक्स...' प्लास्टिक सर्जरी करण्यावर 'धूम' अभिनेत्री स्पष्टच बोलली

Rimi Sen PRP Treatment :  रिमी सेननं  नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्लास्टिक सर्जरीवर वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 6, 2024, 10:05 AM IST
'मी फिलर्स आणि बोटॉक्स...' प्लास्टिक सर्जरी करण्यावर 'धूम' अभिनेत्री स्पष्टच बोलली title=
(Photo Credit : Social Media)

Rimi Sen PRP Treatment : बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन गेल्या काही दिवसांपासून तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे. खरंतर, नुकतीच रिमीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात तिचा बदललेला चेहरा पाहायला मिळतोय. रिमीचे हे फोटो पाहिल्यानंतर तिचे चाहते अंदाज लावत आहेत की रिमीनं तिच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केली आहे. या सगळ्यात रिमीनं तिची प्रतिक्रिया नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली आहे. 

रिमी सेननं ही मुलाखत हिंदुस्तान टाइम्सला दिली होती. रिमीनं याविषयी सांगितलं की जर लोकांना असं वाटत आहे की प्लास्टिक सर्जरी केली का आणि हे पॉझिटिव्ह वेमध्ये असेल तर माझ्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. कोणतीही प्लास्टिक सर्जरी न करता लोकं हे बोलत आहेत. मी फक्त फिलर्स, बोटॉक्स आणि PRP ट्रीटमेंट केली आहे आणि त्याशिवाय इतर काहीही नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढे या ट्रिटमेंटविषयी बोलताना रिमीनं सांगितलं की 'मी चांगलं दिसण्यासाठी डॉक्टर मला मदत करत आहेत. याचा अर्थ माझ्या आताच्या काही फोटोंमध्ये त्यांना माझी त्वचा चांगली दिसते. या ट्रिटमेंटनं कोणीही सुंदर दिसू शकतं. पण जर तुम्हाला हे वाईट दिसत असेल तर मला हे नीट कसं करावं हे सांगा, म्हणजे मी माझ्या डॉक्टरांना सांगू शकेन की ते चूक करत आहेत.'

रिमीनं पुढे सांगितलं की 'कोणत्याही व्यक्तीला तोपर्यंत प्लास्टिक सर्जरीची गरज पडत नाही जो पर्यंत ते कोणतं क्राइम करत नाही. भारताच्या बाहेर अनेक डॉक्टर आहेत, जे फेसलिफ्ट ट्रीटमेंट करतात. वयाच्या 50 शीत गेल्यानंतर मी देखील माझा फेसलिफ्ट करून घेईन. सध्या या ट्रीटमेंटनं काम सुरु आहे.'  

हेही वाचा : मुंबईत सुनामी आली तर अँन्टिलियाचं काय होईल? AI नं दाखवले PHOTOS

दरम्यान, रिमीविषयी बोलाचे झाले तर ती लोकप्रिय अभिनेत्री आहे. हंगामा, धूम, दीवाने हुए पागल आणि फिर हेरा फेरी सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रिमी ही 'बिग बॉस 9' मध्ये देखील एक स्पर्धक म्हणून दिसली होती. रिमी ही 42 वर्षांची आहे. तर तिचं खरं नाव शुभमित्र सेन असं आहे. सध्या रिमी ही इंडस्ट्रीपासून लांब आहे.