Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, सीबीआयनं दिला महत्त्वाचा निर्णय

Rhea Chakraborty Bail: रिया चक्रवर्तीला आता एक मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सध्या तिला मोकळा श्वास मिळाला आहे. CBI नं यावेळी कोर्टात तिच्या जामीनाला आव्हान न देण्याचे कोर्टात सांगितले आहे. 

Updated: Jul 18, 2023, 09:14 PM IST
Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, सीबीआयनं दिला महत्त्वाचा निर्णय  title=
July 18, 2023 : rhea chakraborty ndps case bail becomes final after central government tells sc it wll not press appeal (Photo: Zee News)

Sushant Singh Rajput News: 2020 साली लॉकडाऊन लागलं आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये एक वेगळाच सिलसिला सुरू झाला. 14 जून 2020 रोजी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं आपल्या बांद्राच्या राहत्या घरी आत्महत्या केली आणि अख्खं बॉलिवूडच हादरलं. सुशांत सिंग राजपूतच्या केसचा तपास करता करता या प्रकरणाला एक वेगळं वळणं मिळाले आणि त्यातून रिया चक्रवर्तीचे नावं हे पुढे आले होते. हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात होते आणि एकमेकांना डेट करत होते. त्यांचे अनेक फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यातून त्यांच्या अफेअर्सचीही चर्चा रंगली होती. रिया चक्रवर्तीचे ड्रग्ज केसमध्येही नावं आले होते. त्यामुळे ती अनेक दिवस तुरूंगात होती. त्यानंतर तिला जामीनही मिळाला होता. परंतु आता या बाबतीत रिया चक्रवर्तीला दिलासा मिळाला आहे. 

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसवी राजू यांनी सांगितले की, CBI तिच्या जामीनला अपील करणार नाही. मात्र या कायद्याचा प्रश्न हा योग्य वेळी विचारासाठी खुला ठेवला जाईल. परंतु सेक्शन 27A नुसार एखाद्याला तुरूंगात पाठवले जाऊ शकते. या निर्णयाची सुनावणी जस्टिस एएस बोपन्ना आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठानं केली. यावेळी हेही सांगितले की ते कलमाच्या स्पष्टीकरणानुसार, ते विचारांसाठी खुले ठेवावे आणि आदेशाला देखील उदाहरण देऊ नये', असे एएसजी म्हणाले. यापुर्वी बॉम्बे हायकोर्टानं रियाच्या जामीनावेळी सांगितले होते की, ड्रग्स खरेदी करून त्याच्यासाठी पैसे दिले याचा अर्थ असा नाही की ती अवैध तस्करी करत होती. नशापाणीच्या पदार्थांसाठी पैसे देणे म्हणजे याचा हा अर्थ नाही की तिनं कोणाला यासाठी प्रोत्साहन केले आहे. 

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला 1 महिना तुरूंगवास करण्यात आला होता. त्यातून अनेक तिच्या चाहत्यांनी आणि तिच्या इंडस्ट्रीतल्या सहकलाकारांनी तिच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी तिच्यासाठी पांठिंबा दिला होता. रिया चक्रवर्ती ही एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. ती आपल्या हटके आणि आगळ्यावेगळ्या स्टाईलसाठीही ओळखली जाते. सध्या ती रोडिजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. त्यातून तिनं अनेक लोकप्रिय चित्रपटांतून कामं केली आहेत. सोशल मीडियावरही तिचे असंख्य फॉलोवर्स आहेत. 

हेही वाचा- बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रेटींनी चित्रपटांपेक्षा टेलिव्हिजनमधून कमावले सर्वाधिक पैसे

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनं अख्खा देश हादरला होता. अनेक महिने त्याच्या या प्रकरणाची माध्यमांमध्ये चर्चा पिकली होती. सुशांत सिंग राजपूतला जाऊन 3 वर्षे पुर्ण झाली आहेत.