Review : टॉयलेट एक प्रेम कथा

अक्षय कुमारचा बहुचर्चित टॉयलेट एक प्रेम कथा रिलीज झाला आहे, यात अक्षय सोबत भूमी पेडणेकरने भूमिका साकारली आहे.

Updated: Aug 11, 2017, 03:44 PM IST
Review : टॉयलेट एक प्रेम कथा title=

मुंबई : या सिनेमात अक्षय कुमारचं लग्न म्हशीसोबत लावण्यात आलं आहे, त्याचं कारणंही अजब आहे. अक्षय कुमारचा बहुचर्चित टॉयलेट एक प्रेम कथा रिलीज झाला आहे, यात अक्षय सोबत भूमी पेडणेकरने भूमिका साकारली आहे, भूमीचा हा दुसरा सिनेमा आहे, तरी देखील अक्षय कुमारच्या तोडीस तोड भूमिका भूमीने साकारली आहे. अनुपम खेर यांनी देखील मुख्य भूमिका साकारली आहे.

ही कथा गावात राहणाऱ्या केशववर आधारीत आहे. केशवला मंगळ असतो, यासाठी त्याचं लग्न म्हशीसोबत लावण्यात येतं, म्हशीसोबत त्याचं लग्न होत असताना, त्याची नजर जया म्हणजेच भूमी पेडणेकरवर पडते, त्याला पहिल्या नजरेत प्रेम होतं, येथून लव्ह स्टोरी सुरू होते.

केशव-जयाचं लग्न होतं, यानंतर जया केशवच्या घरी राहायला येते, तेव्हा केशवच्या घरी टॉयलेट नसतो. यावरून जयाला खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो, केशव आपल्या पत्नीला टॉयलेटसाठी कधी दुसऱ्याच्या घरी, तर कधी स्टेशनवर आलेल्या रेल्वेच्या टॉयलेटमध्ये टॉयलेटसाठी घेऊन जातो. 

एकेदिवशी या सर्व गोष्टींना जया त्रासते आणि नंतर ती घर सोडून जाते, या दरम्यान सरकारी जाहिरात केल्यासारखा सिनेमा वाटतो. अनेक दृश्य सिनेमात पुन्हा - पुन्हा घेतले जातात.

गावातच या सिनेमाचं शुटिंग झालं आहे, मात्र अक्षय कुमार आणि भूमी पडणेकरच्या दमदार अभिनयामुळे या सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालेल असं म्हटलं जात आहे.