Rekha यांच्या ओढणीनंच संपवलं पतीनं आयुष्य..., शेवटच्या पत्रानं झाला मोठा उलगडा

Rekha यांच्या पतीनं असं का केलं आणि इतकंच काय तर शेवटच्या पत्रात रेखा यांचे नाव घेतल्यानं सगळ्यांना का बसला होता धक्का. 

Updated: Jan 12, 2023, 12:16 PM IST
Rekha यांच्या ओढणीनंच संपवलं पतीनं आयुष्य..., शेवटच्या पत्रानं झाला मोठा उलगडा title=

Rekha's Husband Mukesh Aggarwal End His Life : बॉलिवूड एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा (Rekha) या फक्त त्यांच्या सौंदर्यासाठी नाही तर त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. रेखा आणि बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं रिलेशनशिप तर आजही हॉट टॉपिक आहे असं म्हणायला हरकत नाही. अमिताभ हे विवाहित होते त्यामुळे त्यांचा आणि रेखा यांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात आहे. अमिताभ यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर, रेखा यांनी बिझनेसमन मुकेश अग्रवाल (Mukesh Aggarwal) यांच्याशी लग्न केले. त्यानंतर रेखा यांना वाटले की त्यांच्या आयुष्यात आता सगळं काही नीट होईल. पण त्यांच्या आयुष्यात दुसरंच काही होतं. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या काही वेळानंतर रेखा आणि त्यांचे पती मुकेश यांच्यावर वाद सुरु झाले. 

लग्नानंतर मुकेश डिप्रेशनमध्ये गेल्याचे सांगण्यात आले होते. हे सर्व सुरु असताना एके दिवशी रेखा यांची पती मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. रिपोर्टनुसार, तर असे म्हटले जाते की मुकेश यांनी रेखा यांच्या ओढणीनं गळफास घेतला. पतीच्या निधनानंतर रेखा यांना खूप मोठा धक्का बसला होता. 

हेही वाचा : Rakhi Sawant Marriage : माझं लग्नच झालं नाहीये; राखी सावंत नं लग्नाचे फोटो शेअर करताच बॉयफ्रेंडनं फिरवली पाठ

दरम्यान, मुकेश यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिले होते की रेखासाठी ते त्यांच्या संपत्तीतील एकही गोष्ट सोडणार नाही कारण रेखा स्वतः इतकी सक्षम आहे की ती कमवू शकते. खरंतर रेखा यांचे पती मुकेश यांच्या या सुसाईड आणि आत्महत्येनंतर अनेकांनी रेखा यांचा जबाबदार ठरवले होते. तर दुसरीकडे मुकेश यांच्या कुटुंबीयांनी रेखा या त्यांच्या पतीच्या आत्महत्येसाठी जबाबदार नाही असे म्हटले होते. रेखा यांनी आमच्याकडे कधीच काही मागितले नाही, असे सांगितले. मुकेश अग्रवाल यांच्या निधनानंतर रेखा यांनी अभिनेता विनोद मेहरा यांच्यासोबत लग्न केले होते, मात्र ते देखील यशस्वी होऊ शकले नाही. 

रेखा यांनी एका मुलाखतीत लग्न करताना फक्त पुरुष का मला मुलीशी लग्न करायचे आहे...रेखा यांची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी त्याच्या लग्नाच्या योजनांबद्दल सांगितलं. या मुलाखतीत रेखा म्हणाल्या की, तिचे अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे आणि ते नेहमीच राहिल! जेव्हा रेखा यांना पुनर्विवाहाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा अभिनेत्री म्हणाली, फक्त पुरुषच का, मला मुलीशी लग्न करायचं आहे..