हेमा मालिनींच्या 75 व्या बर्थडे पार्टीत रेखा यांचा बेधुंद डान्स; VIDEO व्हायरल, नेटकरी म्हणाले 'या वयात...'

बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी नुकताच आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाला धर्मेंद्र यांच्यासह मुली उपस्थित होत्या. तसंच रेखा, जया बच्चन आणि जितेंद्र अशा जुन्या मित्रांनीही हजेरी लावली.   

शिवराज यादव | Updated: Oct 17, 2023, 01:02 PM IST
हेमा मालिनींच्या 75 व्या बर्थडे पार्टीत रेखा यांचा बेधुंद डान्स; VIDEO व्हायरल, नेटकरी म्हणाले 'या वयात...'  title=

बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी नुकताच आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुटुंबीय, मित्र आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. धर्मेंद्र यांच्यासह हेमा मालिनी यांच्या दोन्ही मुली वाढदिवसाला हजर होत्या. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो, व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामधील एका व्हिडीओ रेखा आणि हेमा मंचावर 'क्या खूब लगती हो' गाण्यावर नाचताना दिसत आहेत. 

हेमा मालिनी यांनी आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्यांची काही गाणी आजही तितकीच सुपरहिट आहेत. अशाच एका सुपरहिट गाण्यावर हेमा मालिनी आणि रेखा नाचत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवर एका फॅन पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावेळी दोघीही नेहमीप्रमाणे साडी आणि दागिन्यांनी मढलेल्या दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bollywoodirect (@bollywoodirect)

काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यानंतर नेटकरी यावर कमेंट करत आहेत. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, "सुवर्णकाळातील हिरोईन्स...त्यांनी बॉलिवूड आणि लोकांच्या मनोरंजनासाठी किती काही दिलं आहे". तर एकाने दोघीही अत्यंत सुंदर दिसत असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी त्यांच्या साड्यांचं कौतुक केलं असून, त्यावरुन नजर हटत नसल्याचा उल्लेख केला आहे. तर एकाने दोघी फार गोड दिसत असल्याचं म्हटलं आहे. 

दरम्यान दुसऱ्या एका व्हिडीओत हेमा मालिनी 'ओ रंगीला कैसा जादू किया' गाण्यावर नाचताना दिसत आहेत. या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी लाईव्ह परफॉर्मन्स दिला. 

हेमा मालिनी यांच्या ग्रँड बर्थडे पार्टीत जया बच्चन, पद्मिनी कोल्हापुरे, जॅकी श्रॉफ, जितेंद्र, राकेश रोशन यांसारखे अनेक सेलिब्र्टी सामील झाले होते. सलमान खान, राजकुमार राव, विद्या बालन, शिल्पा शेट्टी, राणी मुखर्जी, माधुरी दीक्षित आणि इतर अनेकांसह तरुण अभिनेतेही यावेळी उपस्थित होते.