आईच्या एका वाईट सवयीनं 'या' अभिनेत्रीचं कुटुंब उध्वस्त; वडिलांच्या निधनानंही तिला रडू आलं नाही, कोण आहे 'ती'?

Entertainmet News : वडिलांच्या निधनानंतर तिनं दु:खच व्यक्त केलं नाही. पण, असं नेमकं का? वाटेवरील अनेक अडचणी दूर करणारी ही अभिनेत्री कोण?   

सायली पाटील | Updated: Oct 10, 2023, 09:25 AM IST
आईच्या एका वाईट सवयीनं 'या' अभिनेत्रीचं कुटुंब उध्वस्त; वडिलांच्या निधनानंही तिला रडू आलं नाही, कोण आहे 'ती'? title=
rekha birthday special Actress did not mourn father death family incomplete love entertainment news

Entertainmet News : बऱ्याच प्रसंगी 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं...', ही ओळ आपण ऐकतो, वाचतो अनेकदा तर आपणच तिचा उच्चारही करतो. यामागं तशीच कारणंही असतात. कारण, वरवर चांगल्या वाटणाऱ्या सर्वच गोष्टी अंतर्बाह्य चांगल्याच असतात याची काही शाश्वती नसते. कालाकारांच्या आयुष्याबाबतही काहीसं तसंच आहे. कारण, समोरून त्यांच्या जीवनात कितीही श्रीमंती, प्रसिद्धी, आनंद असल्याचं आपल्याला जाणवलं तरीही प्रत्यक्षात मात्र या मंडळींनाही आव्हानात्मक काळाचा सामना करावा लागलेला असू शकतो. 

असंच काहीसं एका अभिनेत्रीसोबतही घडलं. सध्या ती कमालीची प्रसिद्धीझोतात आहे. किंबहुना गेल्या अनेक दशकांपासून तिच्या सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ केलं आहे. पण, याच अभिनेत्रीनं बालपणापासून पाहिलेले दिवस इतके वाईट होते की कल्पना करणंही अशक्यच. 

एका मुलाखतीमध्ये आपल्याला कधीच आपल्या वडिलांकडून प्रेम मिळालं नाही, असं सांगणारी ही अभिनेत्री आहे रेखा. अभिनेते जेमिनी गणेशन यांची कन्या. रेखा यांचा जन्म झाला त्यावेळी त्यांची आई पुष्पावल्ली आणि जेमिनी गणेशन यांचं लग्न झालं नव्हतं. त्यामुळं जेमिनी यांनी या लेकिला कधीच आपलं नाव दिलं नव्हतं. किंबहुना वडिलांच्या निधनानंतर रेखा यांनी दु:खही व्यक्त केलं नव्हतं. 

हेसुद्धा वाचा : वाईट! मद्यधुंद अवस्थेत संजय दत्त 'या' अभिनेत्रीमागं चाकू घेऊन धावलेला आणि...

 

'मी त्यांच्या निधनामुळं दु:ख व्यक्त का करावं. त्यांचं आणि माझं काही नातं नव्हतं, माझ्या जीवनात त्यांचं विशेष योगदानही नव्हतं', असं म्हणताना आपल्याला दिलासा या गोष्टीचा आहे की त्यांच्यासोबत कोणत्याही वाईट क्षणांचा अनुभव नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. वडील फक्त माझ्या कल्पनेतच होते अशा शब्दांत रेखा यांनी वडिलांसोबतचं नातं जगासमोर आणलं होतं. (Rekha birthday special love life and interesting facts)

आईच्या एका सवयीनं कुटुंब उध्वस्त 

रेखा यांचं बालपण प्रचंड वेदनादायी होतं. कारण, वडिलांचा आधार नसलेल्या या कुटुंबात रेखा यांच्या आईला जुगाराचं व्यसन होतं. आईच्या याच वाईट सवयीपोटी एक वेळ अशीही आली जेव्हा कुटुंबच उध्वस्त झालं. शेवटी शिक्षण सोडून लगानग्या रेखानं अवघ्या 4 वर्षांच्या वयातच अभिनयाला सुरुवात केली. 'इनती गुट्टू' हा त्यांचा पहिला चित्रपट. 

नाही मिळाली प्रेमाची साथ... 

आई- वडिलांचं एक विचित्र नातं पाहत मोठ्या झालेल्या रेखा यांना प्रत्यक्ष जीवनातही प्रेम मिळालंच नाही. विनोद मेहरा, जितेंद्र, किरण कुमार इतकंच काय तर, संजय दत्त आणि अक्षय कुमारसोबतही त्यांचं नाव जोडलं गेलं. सर्वाधिक लक्ष वेधलं ते म्हणजे रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या कथित नात्यानं. प्रेमाच्या शोधात असणाऱ्या रेखा यांनी 1990 मध्ये व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्नही केलं. पण, हे नातं फार काळ टीकलं नाही. पुढं विनोद मेहरा आणि रेखा यांनी लग्न केल्याची बातमी समोर आली. पण, अभिनेत्याच्या आईचा नकार पचवतानाच या नात्याचाही शेवट झाला. 

Happy Birthday Rekha: From Khubsoorat to Silsila – Check her most iconic  films! | News | Zee News

अशी ही अभिनेत्री आज उतारवयातही एकटीच असली तरीही चाहत्यांचं प्रेम मात्र तिला मोठा आधार देताना दिसतं. रेखा जेव्हाजेव्हा समोर येतात तेव्हातेव्हा त्यांच्या सौंदर्यावर अनेकांच्याच नजरा खिळतात. जणू हा एखादा अलिखित नियमच असावा.