मुंबई : बॉक्सऑफिसवर १० जानेवारीला एकत्रच दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. अजय देवगनचा (Ajay Devgn) 'तानाजी: द अनसंग वॉरियर' (Tanhaji: The Unsung Warrior) आणि दीपिका पदुकोणचा 'छपाक' (Chhapaak). चित्रपट प्रदर्शित होण्याआधी बॉक्सऑफिसवर हे दोनही चित्रपट एकमेकांना चांगलीच टक्कर देणार असल्याचं बोललं जात होतं. पण दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर अजयच्या 'तानाजी...'ने बॉक्सऑफिसवर सुस्साट कमाई करत 'छपाक'ला चांगलंच पछाडलं आहे.
'बॉक्सऑफिस इंडिया'नुसार, 'तानाजी: द अनसंग वॉरियर'ने ओपनिंग डेलाच जवळपास १५.१० कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी हा 'तानाजी...'ने जवळपास २०.५७ कोटींचा गल्ला जमवला आहे. म्हणजेच बॉक्सऑफिसवर 'तानाजी...'ने दोन दिवसांत जवळपास ३५.६७ कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे.
#OneWordReview...#Tanhaji: SUPERB.
Rating:
Drama, emotions, conflict, action, VFX, #Tanhaji is an enthralling experience... Electrifying climax... Top notch direction... #Ajay, #Kajol, #Saif in super form... Get ready for 2020’s first cr+ film. #TanhajiReview pic.twitter.com/N9TwWsWazd— taran adarsh (@taran_adarsh) January 9, 2020
'छपाक'ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ४. ७७ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईने ६.९० कोटींचा आकडा गाठला. दोन दिवसांत 'छपाक'ने जवळपास ११.६७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
#Chhapaak witnesses an upward trend on Day 2, but the 2-day total is underwhelming... Decent at premium multiplexes, but unable to connect *and* collect beyond metros... Needs to cover lost ground on Day 3... Fri 4.77 cr, Sat 6.90 cr. Total: ₹ 11.67 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) January 12, 2020
#Tanhaji roars on Day 2... Metros *and* mass belt, multiplexes *and* single screens, #Tanhaji is simply remarkable... #Maharashtra is record-smashing... Other circuits - decent on Day 1 - join the celebrations on Day 2... Fri 15.10 cr, Sat 20.57 cr. Total: ₹ 35.67 cr. #India biz
— taran adarsh (@taran_adarsh) January 12, 2020
'तानाजी: द अनसंग वॉरियर' आणि 'छपाक' हे दोन्ही चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहेत. अजयच्या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची वीरगाथा दाखवण्यात आली आहे. तर दीपिकाच्या 'छपाक'मध्ये ऍसिड अटॅक पीडिता लक्ष्मी अग्रवालची कहाणी, तिचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.
ओम राऊत दिग्दर्शित 'तानाजी: द अनसंग वॉरियर'मध्ये अजय देवगनशिवाय सैफ अली खान, शरद केळकर, काजोल, नेहा शर्मा, पद्मावती राव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तर मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक'मध्ये दीपिकाशिवाय विक्रांत मेसी, मधुरजीत आणि अंकित बिष्ट प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.