...म्हणून गरोदर ईशा देओलला करावा लागला रिक्षाप्रवास

अभिनेत्री ईशा देओल लवकरच आई होणार आहे.

Updated: Sep 6, 2017, 01:14 PM IST
...म्हणून गरोदर ईशा देओलला करावा लागला रिक्षाप्रवास title=

मुंबई : अभिनेत्री ईशा देओल लवकरच आई होणार आहे.

गरोदरपणाच्या दिवसातही ईशा सार्‍या गोष्टींचा आनंद घेत आहे. मंगळवारी ईशा पती भरत तख्तानीसोबत मुंबईत लंच डेटवर गेली होती. मुंबईत अनंत चतुर्दशीदिवशी गणेश विसर्जनाची धामधूम होती. वाहतुकीचे अनेक रस्ते बदलण्यात आले होते तसेच काही बंद ठेवण्यात आले होते. 
गणपती विसर्जनाची धामधूम पाहता लंच डेटला गाडीने जाणं शक्य नसल्याने ईशा आणि भरतने रिक्षाने जाण्याचा पर्याय निवडला. ही रिक्षाची सफर ईशाने एन्जॉयही केली. त्याचे काही फोटो ईशाने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. 

 

Visarjan day post lunch date took a rickshaw ride back home!!!  "bhai ka jalwa was a smooth rider" #Mumbai Meri jaan #BhaiKaJalwa #CoolBreeze #BackToBasics #RickshawRides #Hubby&me #LunchDate @bharattakhtani3

A post shared by Esha Deol (@imeshadeol) on

 

'विसर्जन पाहता आम्ही लंच डेट नंतर रिक्षाने निघालो आहोत.. भाईचा जलवा स्मूथ राईड आहे' असे कॅप्शन फोटो खाली लिहले आहे. 

नुकताच ईशाचा मुंबईत 'गोदभराई'चा, बेबी शॉव्हरचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमानंतर ईशा - भरत तख्तानी पुन्हा विवाहदेखील केला. यापूर्वीचा विवाह तामिळ पंडीतांनी केला होता. त्यावेळी काहीच कळले नव्हते असे सांगत ईशा - भरत पुन्हा सिंधी पंडिताच्या मंत्रोच्चरणात विवाहबद्ध झाले.