रवीनाच्या 'टिप-टिप बरसा पानी' गाण्यामागचा धक्कादायक किस्सा समोर

1994 मध्ये प्रदर्शित झालेला 'मोहरा' चित्रपट तुम्हाला आठवत असेल. 

Updated: Aug 30, 2021, 02:11 PM IST
रवीनाच्या 'टिप-टिप बरसा पानी' गाण्यामागचा धक्कादायक किस्सा समोर  title=

मुंबई : 1994 मध्ये प्रदर्शित झालेला 'मोहरा' चित्रपट तुम्हाला आठवत असेल. हा तोच चित्रपट आहे ज्यांचे 'टिप-टिप बरसा पानी' हे गाणे पावसाच्या दिवसात अजूनही  गायले जाते. रवीना टंडनने या गाण्यात पिवळी साडी नेसून जबरदस्त डान्स केला होता.  मोहरा हा चित्रपट आजही या गाण्यामुळे लक्षात आहे.

रवीनाने या गाण्यात जे नृत्य केले आहे, ते क्वचितच कोणतीही नायिका करू शकली असती. हे गाणं शुट करत असताना फक्त सिनेमाच्या टीमलाच नाही तर चित्रपटाची  मुख्य अभिनेत्री रवीना टंडनला देखील बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागले. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अशा गोष्टी घडल्या ज्या आजही चित्रपटाशी संबंधित कोणताही  सदस्य विसरू शकत नाही.

सतत भिजल्यामुळे रवीनाला ताप 
रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचे 'मोहरा' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अफेअर होते असे म्हटले जाते. 'टिप-टिप बरसा पानी' या गाण्याच्या दरम्यान दोघांनी आपल्या  नृत्याने सेटवर आग लावली. गाण्याच्या चित्रीकरणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यात आला. सतत ओल्या झाल्यामुळे रवीनाला सेटवर प्रचंड ताप आला. असे असूनही  तिने सातत्याने नृत्य सुरू ठेवले. आजारी असतानाही तिने हार मानली नाही.

या गाण्याचे चित्रीकरण 4 दिवसात झाले
एका बांधकामाच्या ठिकाणी हे गाणे 4 दिवस शूट केले गेले. साईटवर दगड आणि खिळे पडलेले होते. गाण्याच्या शूटिंग दरम्यान अनवाणी पायाने नाचाताना ती घसरून  पडली. हा सीन चित्रीत करताना रवीना गंभीर जखमी झाली. दुखापतीमुळे तिच्या गुडघ्याला जखम झाली होती.

मासिक पाळीची अडचण

 रवीना गाण्याच्या शूटिंगदरम्यान पीरियड्सशीही संघर्ष करत होती. 4 दिवस सतत पाण्यात शूट करणे तिच्यासाठी सर्वात कठीण काम होते. ताप आणि मासिक  पाळीमुळे तिची प्रकृती खालावली होती. अखेर त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि चित्रपट-गाणे सुपरहिट झाले. या गाण्यामुळे बॉलिवूडमध्ये रेन डान्सचा ट्रेंड पुन्हा प्रसिद्ध झाला.