'रात्रीस खेळ चाले 2' फेम शेवंता आता रंगभूमी गाजवणार

एका नव्या रुपात 

Updated: Dec 16, 2019, 06:57 PM IST
'रात्रीस खेळ चाले 2' फेम शेवंता आता रंगभूमी गाजवणार  title=

मुंबई : झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चाले. (Ratris Khel Chale) प्रेक्षकांच्या लोकाग्रहास्तव या मालिकेचा दुसरा भाग आहे. पण हा सिक्वल नसून प्रिक्वल तयार करण्यात आला. या मालिकेतील लोकप्रिय पात्र म्हणजे शेवंता. शेवंताने फक्त मोठ्यांचीच नाही तर लहानांची देखील मने जिंकली आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

चरणी वाहिले लोकाश्रयी, शृंगार मदना सुमन पहिले श्रद्धेचे वाहिले, नाव 'शेवंता' प्रेमालयात होती तेंव्हा, प्रसन्न रंगदेवता! तीस नमन करून 'जुई' नामे दुसरे सुमन, चरणी वाहत आहे जन्म-मरण, राग यमना. अनेक वर्षे अनेक पुष्पे, वाहिन त्याच श्रद्धे, करते आवाहन आधी सेवा ही कबुला. आस प्रेमाची, विश्वास माझा, तुमच्या श्रद्धेला. धुंद आसमंत जेंव्हा होईल त्या घटकेला, कराल पुन्हा अमाप गर्दी 'इब्लिस' या नाट-काला… लेखक- दिगदर्शक: मिलिंद शिंत्रे नेपथ्य: संदेश बेंद्रे संगीत: राहुल रानडे प्रकाश योजना: शितल तळपदे वेशभूषा : महेश शेरला कलाकार / पात्र परिचय: राहुल मेहंदळे, सुनील देव, अपूर्वा नेमळेकर उर्फ 'जुई', आणि वैभव मांगले शुभारंभाचा प्रयोग दिनांक २१ डिसेंम्बर २०१९ वेळ रात्री ८.३० वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह आणि लवकरच तुमच्या जवळच्या नाट्यगृहात शब्दांकन मंगेश साळवी . #apurvanemlekar #newbeginnings #newnatak #Iblis #Iblisthenatak #jui #zeemarathi Thank you @zeemarathiofficial 

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

या शेवतांने छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच मन जिंकल्यानंतर आता रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) लवकरच एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता शेवंता स्क्रीनवर नाही तर रंगमंचावर दिसणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

IBLIS ...coming soon Swipe right  . #apurvanemlekar @mehendalerahul #vaibhavmangle @zeemarathiofficial #marathinatak #theatre

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

'इब्लिस' हे मराठी नाटक घेऊन अपूर्वा येत आहे. या नाटकाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. मात्र या नाटकाच्या कथानकाबद्दल काहीच माहिती शेअर करण्यात आलेली नाही. या नाटकांत अपूर्वा 'जुई' हे पात्र साकारत आहे. 'इब्लिस' असा या नाटकाची टॅगलाईन 'शैतान हाजिर' अशी असून अभिनेता वैभव मांगले प्रमुख भूमिकेत या नाटकात आहे. तर अभिनेता राहुल मेहेंदळे आणि सुनील देव देखील या नाटकात महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत.